"वॉटर कप" स्पर्धेत बबनरावजी शिंदे कारखान्याचे कर्मचारी सहभागी

किरण चव्हाण 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

माढा (सोलापूर) : पाणी फाऊंडेशनच्या "वॉटर कप" स्पर्धेत भाग घेतलेल्या माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे ग्रामस्थांसह बबनरावजी शिंदे शुगरचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्यासह कारखान्याच्या पाचशे कर्मचार्‍यांनी तीन तास श्रमदान करून आठशे घनमीटर गाळ काढला आहे. 

गुरूवारी ( ता.19) सकाळी लोंढेवाडी येथील चारशे - पाचशे ग्रामस्थ व बबनरावजी शिंदे शुगरच्या सुमारे पाचशे अधिकारी व कर्मचारी या श्रमदानात सहभागी झाले. लोंढेवाडी येथे श्रमदानासाठी सरपंच सारिका लोंढे यांच्या नेतृत्वाखाली रात्री मशाल फेरी काढून जनजागृती केली.

सध्या लोंढेवाडीतील ग्रामस्थ दररोज श्रमदान करताहेत. ग्रामस्थांपैकी काहीजण अल्पोपहाराची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करतात. भारतीय जैन संघटनेनेही लोंढेवाडीला या कामासाठी जे. सी. बी. मशिन दिले आहे. शासनाकडून डिझेलसाठीही दीड लाख रूपये देण्यात येणार असल्याचे तहसिलदार सदाशिव पडदुणे यांनी कामाला भेट दिल्यावर सांगितले. 4 किलोमीटरचा ओढा खोलीकरण व रूंदीकरण, समतल चर, कंपार्टमेंट यासारखी  कामे सध्या मोठया प्रमाणावर  सुरू आहेत. मानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील वाॅटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्य सर्व गावात कारखान्याचे कर्मचारी श्रमदान करणार  असून तालुक्यातील इतर गावातून मागणी आल्यास कर्मचारी श्रमदानासाठी पाठवणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.

Web Title: employee of babanrao shindr sugar factory participate in water cup competition