व्हॉट्‌सऍपवरील प्रचारही खर्चात धरणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

सातारा - नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असून, लवकरच या प्रचारासाठी होणारा खर्चही उमेदवारांच्या खर्चात धरण्याचा आमचा प्रयत्न आहे. 28 डिसेंबरपर्यंत उमेदवारांनी खर्च जमा न केल्यास त्यांना पुढील सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिली. 

पालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात श्री. सहारिया यांनी आज विभागीय आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, ""पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांत 30 पालिका, 11 नगरपंचायतींचा समावेश आहे. यातून 30 नगराध्यक्ष निवडले जातील. एकूण 494 प्रभागांतून 3035 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षाची थेट निवड होणार असून, त्यासाठी 280 उमेदवार रिंगणात आहेत. एका मतदाराला तीन ते चार मते द्यावी लागणार असल्याने मतदानासाठी वेळ जाणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी आम्ही 1601 मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात 32 संवेदनशील केंद्रे आहेत. फलटणला सात, कऱ्हाडला पाच आणि पाटणमधील दोन केंद्रांचा त्यात समावेश आहे. मतदाराला तीन ते चार मते द्यावी लागणार असल्याने आम्ही दोन टप्प्यात प्रशिक्षण देणार आहोत. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे.'' 

लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढताना त्यांच्या स्वेच्छा निधीतून खर्च करण्यावर या काळात बंधन घातले आहे. निवडणुकीपूर्वी तीन महिने आमदार, खासदार निधीतून खर्च करता येणार नाही. वृत्तपत्रे व विविध चॅनेलवर येणाऱ्या जाहिरातींवर आमचे लक्ष असून, 25 नोव्हेंबरपर्यंतच जाहिराती घेता येतील. मात्र, सभा, बैठकांच्या बातम्यांसाठी कोणतेही बंधन नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर...

03.21 PM

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी...

01.00 PM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017