पर्यावरण मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानऊघडनी

Environment Minister criticize officers
Environment Minister criticize officers

कोल्हापूर : पंचगंगेचे प्रदुषण वाढतेय पण कोणालाही त्याचे गांभीर्य नाही. पण येत्या दोन महिन्यात पंचगंगा प्रदुषणमुक्त केली जाईल. दरम्यान नदी प्रदुषण करण्यास जबाबदार कारखाने आणि अधिकारी यांच्यावरही कायद्याच्या आधारे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. कोल्हापुरात पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्‍नी आयोजीत बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पंचगंगा नदी प्रदुषणाबाबत गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्र्यानी इचलकरंजी काळा नाला, शिरोळ आणि आसपासच्या गावातील नदी नाल्यांची पाहणी केली. त्यानंतर कोल्हापुरात जयंती नाल्याचीही पाहणी केरी यानंतर सर्किट हाउसमध्ये आयोजीत बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. 

पैसे आले की नुसते डांबर ओतायचे आणि टेंडर काढायचे एवढेच काम करता काय. रस्ते आणि इमारतीशिवाय काही बघु नका. तुम्ही खोटे बोलुन शासनाची दिशाभुल करताय तुमच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पर्यावरण आणि नाले सफ़ाई कामे कधी करणार. अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना धारेवर धरले. वर्षभरात महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हापरिषदेमार्फ़तही कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याबद्दल 
जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांचीही कानउघाडणी केली.

शहरात सांडपाणी किती तयार होते त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया होते याची सविस्तर माहिती कदम यांनी घेतली. आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उत्तराची शहानिशा करुन घेताना या प्रदुषणाबाबत आंदोलन करणारे कार्यकर्ते विनाकारण आंदोलन करतात काय असाही प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पर्यावरण तज्ञ, कार्यकर्ते यांच्याही तक्रारी ऐकुण नदी प्रशासनाची कान उघडनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com