तोंडात राम व पोटात नथुराम या औलादींचे भाजप सरकार- अजित पवार

ajit-pawar.
ajit-pawar.

कऱ्हाड - तोंडात राम व पोटात नथुराम या औलादींचे भाजप सरकार आहे अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज(शनिवार) केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, भाजप शेतकऱ्यांना न्याय देवू शकत नाही, मागासवर्गीयांना न्याय देवू शकत नाही, असले सरकार काय कामाचे. त्यांना आता घरी बसवा. धनगर समाजाला, लिंगायत, मुस्लीम व मराठा समाजाला आरक्षण पहिल्या कॅबीनेटला देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात काही केले नाही. व्यापाऱ्यांनी हे सरकार आणण्यासाठी हातभार लावला. आता त्यांच्याही लक्षात आलंय. हे सरकार लांडग्यासारख आहे. लबाड लांडग विकास कोल्याच सोंग करतय. त्याला भूलू नका.

नाभीक समाजाबद्दलच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर टिका करताना त्यांची थट्टा करताय हे लक्षात ठेवा ते फेडाव लागणार हाय असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com