...त्याच्या मदतीसाठी धावले आनंदवन मित्रमंडळ; तब्बल ४४ लाखांचा निधी जमवला

help by anandvan
help by anandvan

श्रीगोंदे : शहरात दहा वर्षांपुर्वी महामानव बाबा आमटे वसतीगृह सुरु करुन फासेपारधी व भटक्या समाजातील मुलांवर संस्कार करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड करणाऱ्या अंनत झेंडे व त्याच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीला मुबंईकरांनी सलाम केला आहे. या संस्थेला भेडसावणाऱ्या आर्थिक मदतीवर तोडगा काढण्यासाठी आयोजीत केलेल्या संगीत रजनी कार्यक्रमातून जमवलेले ४४ लाख रुपयांचा निधी डाॅ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते देण्यात आला.

नगरच्या स्नेहालयाच्या धर्तीवर श्रीगोंद्यासह आसपासच्या परिसरात राहणाऱ्या फासेपारधी कुटूंबातील लहान मुलांना दत्तक घेऊन अनंत याने सहकारी विकास पाटील, दत्ता गिरमकर आदी सहकाऱ्यांनी दहा वर्षापुंर्वी टाकलेले धाडशी पाऊल आज सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. लोकांच्या दारापर्यंत मदतीसाठी जावून बसणाऱ्या अनंतचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अखेर बाबा आमटे मित्रमंडळ धावले.

फासेपारधी आणि अन्य भटक्या विमुक्त समुहातील बालकांच्या भविष्यासाठी गेले १ दशक समर्पित सेवाकार्य करणाऱ्या या संस्थेच्या घुगलवडगाव ता. श्रीगोंदे येथील नियोजित दोनशे बालकांच्या निवासी पुनर्वसन संकुलाच्या उभारणीसाठी आनंदवन मित्र मंडळ मुबई यांनी रविवारी (२१ जानेवारी 2018) विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात अनोख्या संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला. गजल गायक भीमराव पांचाळे यांच्या गायनाचा कार्यक्रमासह डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे या दापंत्याची प्रकट मुलाखतही झाली. मुंबईतील आनंदवन मित्र मंडळ ही संस्था मागील २ दशकांपासुन आनंदवनसह तृणमूल सेवाकार्य करणाऱ्या संस्थांना दरवर्षी बहुविध उपक्रमांद्वारे आर्थिक मदतीससह कार्यकर्ते जोडून देत असते. यावर्षी महामानव बाबा आमटे संस्थेच्या नियोजित मुलांच्या निवासी पुनर्वसन संकुलासाठी या कार्यक्रमातून जमा झालेल्या ४४ लाखाचा धनादेश आमटे दापंत्यांच्या हस्ते अनंत व त्याच्या सहकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी राज्यातील दहा विविध संस्थांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार व  मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. 
यावेळी वयाची साठी ओलांडलेले आनंदवन मित्र मंडळाचे  अध्यक्ष नरेंद्र मिस्त्री , प्रफुल्ल पुरंदरे , स्मिता गावस्कर, अभिजित पठारे , बबन निखाळजे , प्रकाश दुडम , आदिश माने , राजेंद्र देशपांडे , सिद्राण बंडगर , सतीश प्रभू , शाम मिस्त्री , शरयू घाडी  उपस्थितीत होते. 

आणि अनंत भावनाविवश झाला...
विद्यालयातील शिपायाची नोकरी सांभाळून पारधी समाजाच्या मुलांची जबाबदारी घेतल्यावर अनेकांनी वेड्यात काढलेल्या अनंतची यशोगाथा पहिल्यांदा 'सकाळ'ने मांडली. त्यानंतर त्याला मदतीचा ओघ सुरु झाला. त्याच्या जिद्दीच्या कामावर आता कळस चढला असून मुंबईतील जेष्ठांनी केलेल्या भरघोस मदतीनंतर त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com