कागल : नगरपालिकेतील आगीत चार विभागांची कागदपत्रे खाक

वि.म.बोते
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कागल नगरपालिका ही "क" वर्ग नगरपालिका आहे. विकासकाम व नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहिली. पालिकेत अलिकडे झिरो पेंडन्सीची लगबग सुरु होती. नव्वद टक्‍क्‍याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. शुक्रवार ता.10 रोजी सायंकाळी बाळू पसारे हे वॉचमन पालिकेत रात्रपाळीस होते असे सांगण्यात आले. बसस्थानकाच्या मागील बाजूस शाहू इन्स्टिट्युटच्या वरील बाजूस एफेक्‍स मिडिया ऍनिमेशन व सॉफ्टवेअर ही संस्था आहे.

कागल : कागल नगरपालिकेला भीषण आग लागून पालिकेचे आरोग्य, बांधकाम, सुवर्ण जयंती, भांडार हे विभाग जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत या विभागातील आठ संगणक, प्रिंटर, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, प्रस्ताव, बांधकाम परवानगी प्रस्ताव, लोखंडी कपाटे, लाकडी कपाटे, टेबल खुर्ची फर्निचर आदी जळून बेचीराख झाले. पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. कागल नगरपालिका, पंचतारांकित एमआयडीसी व शाहू साखर कारखाना यांच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. सकाळी सहा वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. पालिकेच्या इतिहासात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. झिरो पेंडन्सी व ऑनलाईन यामुळे बहुतांश रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकते असे पालिका प्रशासनाचे मत आहे. 

कागल नगरपालिका ही "क" वर्ग नगरपालिका आहे. विकासकाम व नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहिली. पालिकेत अलिकडे झिरो पेंडन्सीची लगबग सुरु होती. नव्वद टक्‍क्‍याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. शुक्रवार ता.10 रोजी सायंकाळी बाळू पसारे हे वॉचमन पालिकेत रात्रपाळीस होते असे सांगण्यात आले. बसस्थानकाच्या मागील बाजूस शाहू इन्स्टिट्युटच्या वरील बाजूस एफेक्‍स मिडिया ऍनिमेशन व सॉफ्टवेअर ही संस्था आहे. या ठिकाणी रात्री काही तरुण काम करत होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांना मोठा आवाज ऐकू आल्याने ते बाहेर आले. यावेळी त्यांना पालिकेला आग लागल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यातील एकाने बसस्थानकाजवळ असलेल्या पालिकेच्या अग्निशमन केंद्रावर जाऊन आगीची माहिती दिली. अग्निशमनची गाडी तातडीने पालिकेजवळ आली. मात्र गेटला कुलूप असल्याने आतमध्ये जाता येईना. काहींनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही घटना पालिकेचे पक्षप्रतोद प्रविण काळबर व विभाग प्रमुख बी.ए. माळी यांना कळाली. तेही घटनास्थळी दाखल झाले. आतमध्ये आगीचे लोट दिसत होते. आतील बाजूस मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या गाड्या असल्याचे लक्षात आहे. गाडीचालक इम्तिहाज यांना बोडलावून घेण्यात आले. इम्तीहाज आल्यानंतर अग्नीशमन दलाची गाडी व ती तरुण मुले, बी.ए. माळी, प्रविण काळबर यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्णिशमनचे राहूल आंबी, चंद्रकांत कांबळे, सतीश माळी, अनिल वड्ड यांनी आग विद्याविण्याचे निकराचे प्रयत्न केले. 

दरम्यान पंचतारांकित औद्यागिक विकास महामंडळाची व शाहू साखर कारखान्याची गाडी मागविण्यात आली. त्यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे सहा वाजेपर्यंत आग विझविण्यात यश आले. 

या आगीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, प्रस्ताव, प्रमाणपत्रे जळून राख झाले. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, मुख्याधिकारी टिना गवळी, तहसिलदार किशोर घाडगे आदंनी घटनास्थळी भेट दिली. 

 

टॅग्स