तिसरे अपत्य असल्याच्या तक्रारीमुळे शिवसेना नगरसेविका अडचणीत

Shivsena
Shivsena

सोलापूर- महापालिकेच्या प्रभाग 11 (क) मधून विजयी झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांना तीन अपत्य असून पैकी दोन अपत्य 1 सप्टेंबर 2009 नंतर झाली आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी भाजपच्या पराभूत उमेदवार भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी केली आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचा अर्ज त्यांनी निवडणूक कार्यालयात दिला आहे. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी प्रभाग 11 (क) या जागेवरून सौ. मगर विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी म्हंता यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सौ. मगर यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दोन पेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात त्यांना तीन अपत्यं असल्याने त्या महाराष्ट्र महापालिका निवडणूक अधिनियम 1949 मधील कलम 10 (आय) नुसार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती देऊन त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सौ. म्हंता यांनी केली आहे. 

सौ. मगर यांनी जोडलेले अपत्यांचे जन्मदाखले भारतीय पुरावा कायदा अन्वये सार्वजनिक मालमत्ता असून (पब्लिक डॉक्‍युमेंटस) या दाखल्यांमध्ये अपत्याचे, आई-वडिलांचे व जन्मतारखा पाहिल्या असता सौ. मगर यांचे नगरसेवकपद रद्द करणे योग्य होईल. तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने मला विजयी घोषित करावे, असेही सौ. म्हंता यांनी म्हटले आहे. 

अपत्यांबाबत दुसरी तक्रार 
प्रभाग 26 (ब) मधील भाजपच्या नगरसेविका राजेश्री चव्हाण यांना तीन अपत्य असल्याची तक्रार कॉंग्रेसच्या ऍड. उमा पारसे यांनी घेतली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशाच प्रकारची दुसरी तक्रार दाखल झाली असून, त्यामध्ये भाजप व शिवसेनेच्या नगरसेविका एकमेकांसमोर आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com