धुळे खून प्रकरण- आरोपीला मदत केल्याच्या संशयावरून एकास ताब्यात घेतले

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 27 जुलै 2017

संगमनेर शहरातील जेधे कॉलनीत लखन दीपक जेधे नामक तरुण राहतो. धुळे येथील गुड्डया नामक युवकाच्या खुनातील आरोपींना लखन जेधे याने मदत केल्याचा धुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आहे. धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी व त्यांचे पथक बुधवारी सायंकाळी संगमनेर शहरात आले होते.

तळेगाव दिघे(जि. नगर) : धुळे येथील युवक गुडडयाच्या खून प्रकरणातील आरोपीस मदत केल्याच्या संशयावरून धुळे गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बुधवारी सायंकाळी संगमनेर शहरातील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. लखन दीपक जेधे असे या संशयित तरुणाचे नाव असून पोलीस त्यास धुळे येथे घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे. 

संगमनेर शहरातील जेधे कॉलनीत लखन दीपक जेधे नामक तरुण राहतो. धुळे येथील गुड्डया नामक युवकाच्या खुनातील आरोपींना लखन जेधे याने मदत केल्याचा धुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आहे. धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी व त्यांचे पथक बुधवारी सायंकाळी संगमनेर शहरात आले होते. सदर पथक गुडडयाच्या खून प्रकरणातील फरार आरोपींच्या मागावर असून त्यांचे लोकेशन घेत आहे. सदर पथकाने लखन जेधे यास पोलीस ठाण्यात बोलावत चौकशी केली. मात्र त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी गुडडयाच्या खून प्रकरणात आरोपीना मदत केल्याच्या संशयावरून लखन जेधे यास ताब्यात घेत चौकशीसाठी धुळे येथे नेले. तशी नोंद संगमनेर शहर पोलीस स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. धुळे खून प्रकरणाचे धागेदोरे संगमनेर पर्यंत पोहचल्याने खळबळ उडाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: