गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील यांच्यात गुफ्तगू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

सोनाळी - राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्‍यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत बोरवडे मतदारसंघात दररोज वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. शनिवारी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांनी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. अनेक वर्षांचे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आल्याने तालुक्‍यातील राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संवेदनशील असलेला बोरवडे मतदारसंघ खुला आहे. तसेच झेडपी अध्यक्षपदही खुले असल्यामुळे या मतदारसंघाचे महत्त्व वाढले आहे. या मतदारसंघातून राष्टवादीतर्फे मनोज फराकटे यांची उमेदवारी जाहीर झाली असून मंडलिक-घाटगे युतीकडून पंचायत समितीचे उपसभापती भूषण पाटील व वीरेंद्र मंडलिक इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार फराकटे यांनी आपला प्रचार दौरा जोरदारपणे सुुरू केला असून, शिवसेनेकडून मंडलिक की पाटील याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यातूनच भूषण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीबाबत आग्रह धरला असून, उमेदवारी न मिळाल्यास अन्य पर्याय शोधण्यासाठी दबाव आणला जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात राष्टवादीचे नेते गणपतराव फराकटे यांनी आपले राजकीय वैमनस्य विसरून बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली.

याबाबत गणपतराव फराकटे म्हणाले, ""माझा मुलगा मनोज उमेदवार असल्याने सहकार्य मिळावे या उद्देशाने बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली.'' यासंदर्भात बाबासाहेब पाटील म्हणाले, ""निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी मतदारांना भेटणे स्वाभाविक आहे. केवळ सहकार्य करण्याच्या दृष्टीने फराकटे यांनी माझी भेट घेतली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.''

Web Title: Farakate-Patil hidden discussion