सोलापूरमधील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

सोलापूर - कर्जमाफीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय सुकाणू समितीच्यावतीने आज (रविवार) कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी मोबाईलवर संवाद साधत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात आज "सबका साथ, सबका विकास' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मध्यावर आला असतानाच कर्जमाफीची घोषणा सुकाणू समितीने जाहीर केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मोबाईलवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मोबाईलवर फोन करून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल व या निर्णयानंतर पहिल्यांदाच सोलापुरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. यावेळी खासदार अमर साबळे, रोहन देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, सभापती ताराबाई पाटील, उपसभापती संदीप टेळे, राजकुमार पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, आण्णाराव बाराचारे उपस्थित होते.

भाजप सरकारच्या विजयाच्या घोषणा
सुकाणू समितीने कर्जमाफी जाहीर केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. त्याचवेळी शेतकऱ्यांनी "भारतीय जनता पक्षाचा विजय असो' "भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

पश्चिम महाराष्ट्र

सांगली - पुण्यात एस.टी. महामंडळात वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका 53 वर्षीय विकृत बापाने गेली चार वर्षे स्वत:च्या 21 वर्षीय मुलीवर...

10.00 PM

सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा...

07.33 PM

पाथर्डी (नगर): विहरीवर धुणे धुत असताना विहिरीचा कठडा खचल्याने ऋृतुजा विष्णु हिंगे (वय 16 वर्षे) ही विद्यार्थ्यीनी विहरीत पडून...

07.21 PM