सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. सोलापूरमध्येही शेतकऱ्यांनी गुलाब आणि झेंडूची फुले रस्त्यावर फेकून संपात सहभाग नोंदवला आहे.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. सोलापूरमध्येही शेतकऱ्यांनी गुलाब आणि झेंडूची फुले रस्त्यावर फेकून संपात सहभाग नोंदवला आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या प्रमुख मागण्यांसह राज्यभरातील शेतकरी आज संपावर आहेत. दक्षिण सोलापूरमधील वडजी येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संपातील सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी आज सकाळ सहा वाजता गुलाब आणि झेंडूची फुले रस्त्यावर फेकत सरकारविरोधी घोषणा दिल्या. यामध्ये सरपंच कुंडलीक कांबळे, गोविंद चौगुले, परमेश्वर कुंभार, तुळशीराम डोंबाळे, अमोल कवडे, पंडीत पवार, कृष्णा गाटे यांचा सहभाग होता.

मोहोळमधील शेतकऱ्यांचा संपात 100 टक्के सहभाग
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकऱ्यांनी संपात 100 टक्के सहभाग नोंदविला आहे. मोहोळमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्ष्मीबाई बाबुराव पाटील फळ व भाजीपाला मार्केट येथे दररोज सकाळी होत असलेले शेतीमालाचे लिलाव शेतकऱ्यांच्या संपामुळे झाले नाहीत. लिलावस्थळी शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी अगोदरच्या शिल्लक भाजीपाल्याची दुकाने थाटली असून चढ्या भावाने मालाची विक्री करण्यात येत आहे.

दरम्यान सोलापूरमधील कस्तुरबा मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या संपाचा कोणताही परिणाम दिसून आलेला नसून तेथील व्यवहार सुरळित सुरू असल्याचे चित्र आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​
करिअरसाठी स्काय इज द लिमिट​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

 

 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करुन शौचास बसतात. नगरसेवक...

08.27 PM

कऱ्हाड (सातारा): कोयना धरणा पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात सरासरी...

07.42 PM

सातारा : साताऱ्याच्या निसर्गसंपन्नता व सृष्टी सौंदर्याबद्दल मी खूप ऐकले होते. कास पठार व डोंगरदऱ्या पाहिल्यानंतर आपल्याकडे ही...

07.24 PM