खिलारवाडीत कर्जाला कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

जत : बोअरला पाणी न लागल्याने व कर्जाला कंटाळून भैरु आण्णाप्पा कोङलकर ( वय-36) व पत्नी पदुबाई भैरु कोङलकर ( वय- 27, दोघे - रा. खिलारवाडी ता. जत) या शेतकरी दांपत्याने नैराश्‍यातून आत्महत्या केली. 

याबाबत माहिती अशी की, भैरू कोडलकर यांची खिलारवाडी येथे एक एकर शेती आहे. ऊसतोड मजुरी करून त्यांनी द्राक्ष बाग फुलवली होती. त्यासती 2 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. हे कर्ज थकीत झाले. बाग चांगली आली होती. पण पाणी कमी पडत असल्याने अशातच 15 दिवसापूर्वी पाण्याचा बोअर मारण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी 60 हजार रुपये खर्चून 400 फूट बोअर मारले. दुर्दैवाने पाणी लागले नाही. त्यामुळे ते चिंतेत होते.

र्ज फेडायचे कसे व शेतीचे काय होणार याची चिंता सतावत होती. त्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला. पती नंतर मी जगून काय करणार म्हणून तिनेही पातीनंतर आपलीही जीवनयात्रा संपविली. दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्याने दोन मुले पोरकी झाली.