कवठेमहांकाळ तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

कवठेमहांकाळ - घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सोपान श्रीपती शिंदे (वय 70) या शेतकऱ्याने कर्जाच्या चिंतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

कवठेमहांकाळ - घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सोपान श्रीपती शिंदे (वय 70) या शेतकऱ्याने कर्जाच्या चिंतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

सोपान शिंदे यांची पावणेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतीसाठी गावातील एका पतसंस्थेकडून पन्नास हजार, तर विकास सोसायटीकडून 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, द्राक्षबागही वाया गेल्याने उत्पन्न कमी झाले. यातच घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून झाडाला गळफास घेऊन शिंदे यांनी आत्महत्या केली. सोपान शिंदे यांनी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मुलगा संभाजी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.