शेतकऱ्याने वीज महावितरणच्या इमारतीवरुन केला आत्महत्येचा प्रयत्न

सचिन शिंदे
बुधवार, 11 एप्रिल 2018

वीज महावितरणच्या इमारतीवरुन युवा शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

कऱ्हाड - शेतीपंपाची वारंवार खंडीत वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी करवडी येथील युवा शेतकऱ्याने वीज महावितरणच्या इमारतीवरुन आत्महत्या करण्यास उडी मारण्याचा प्रयत्न केला. अमीत डुबल असे संबंधिताचे नाव आहे. अन्य शेतकऱ्यांनी इमारतीवर चढून अमीत यास अडवल्याने पुढील अनर्थ टळला. शोले टाईप झालेल्या आंदोलनाने खळबळ उडाली आहे.

कऱ्हाडच्या महावितरणच्या ओगलेवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयातील प्रकार झाला. तेथे पाच गावातील शेतकऱ्यांनी कार्यालयाला कुलुप लावुन कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले होते. तर अधिकाऱ्यांना दोन तास बाहेरच ठेवले. शेतकऱ्यांकडून सुरळीत वीजपुरवठयाची चार महिन्यापासुन मागणी होत होती. समोर असुनही आत्महत्या करणाऱ्याकडे वीजवितरण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The farmer tried to commit suicide on electricity building in karhad