राजू शेट्टींची डरकाळी फ्लॉप

farmers not attend raju shetty's meting
farmers not attend raju shetty's meting

इस्लामपुर : लोकसभा निवडणूकीत 25 हजार मतांचे मताधिक्य मिळवलेल्या वाळवा तालुक्यात खासदार राजु शेट्टींच्या उपस्थितीत दुध दर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला वाळवा तालुक्यातील अवघे 60  ते 70 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवु अशी डरकाळी फोडणाऱ्या शेट्टींचा त्यांच्या मतदार संघातील बैठकीलाच फ्लॉप शो झाल्याचे दिसले. दिवसेंदिवस शेट्टींची राष्ट्रवादी बरोबर सुरु असलेली अंतर्गत सेटलमेंट सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्त्याना रुचलेली दिसत नाही. 

आज येथील एम डी पवार मंगल कार्यालयात खासदार शेट्टी यांच्या उपस्थित सायंकाळी 5 वाजता बैठकीला सुरवात झाली. प्रदिर्घ काळानंतर शेतकऱ्यांच्या दुधदर प्रश्नाबाबत रस्त्यावरचे आंदोलनाची घोषणा केलेल्या शेट्टींच्या या मेळाव्याला वाळवा तालुक्यात उस्फुर्त  प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मेळावा ठिकाणी मात्र शेतकरी व कार्यकर्ते अत्यल्प होते.

शंभरभर उपस्थीती असलेल्या कार्यकर्त्यामधे कराडहुन 20 जण आल्याचे एका कार्यकर्त्याने स्टेजवर सांगीतले. यावरुन मग उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची मोजदाद केली असता वाळवा तालुक्यातील 60 ते 70 कार्यकर्ते असल्याचे दिसले. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारणात स्थिरावलेल्या शेट्टींची आजची आंदोलनाची बैठक फ्लॉप होणे हे भविष्यातील स्वाभीमानीच्या खडतर राजकीय वाटचालीचे भाकीत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com