शेतकऱ्यांनी विकला आठवडा बाजारात भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

कोल्हापूर - किरकोळ भाजीपाला विक्रेता व एक दलाल यांच्यात झालेल्या जोरदार वादावादीमुळे शाहू मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात ताणावपूर्ण वातावरण बनले. यात एका विक्रेत्याला दलालाकडून धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पण आपापसात मिटविण्याचा प्रयत्न दलाल व विक्रेता यांच्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. 

कोल्हापूर - किरकोळ भाजीपाला विक्रेता व एक दलाल यांच्यात झालेल्या जोरदार वादावादीमुळे शाहू मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात ताणावपूर्ण वातावरण बनले. यात एका विक्रेत्याला दलालाकडून धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पण आपापसात मिटविण्याचा प्रयत्न दलाल व विक्रेता यांच्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. 

किरकोळ विक्रेत्यांनी रविवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला जेमतेम प्रतिसाद मिळाला. बहुतांशी शेतकऱ्यांनी येथे आठवडी बाजारात भाजीपाला विक्री केल्याने त्यांना बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. शहरातील इतरत्र भाजीपाला मंडईतील व्यवहार मात्र चौथ्या दिवशीही ठप्प होते. भाजीपाला खरेदीदाराकडून घेण्यात येणारी सहा टक्के अडत रद्द करावी, तसेच मोघम सौदे पद्धत बंद करावी यांसह विविध मागण्यांसाठी किरकोळ भाजीपाला विक्रेता संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून गेले चार दिवस शाहू मार्केट यार्डात त्यांनी भाजीपाला खरेदी बंद केली आहे. परिणामी शहरातील बहुतेक सर्व मंडईतील भाजीपाला विक्री बंद आहे. 

किरकोळ विक्रेत्यांची कोणतीच मागणी बाजार समिती अथवा शासनाने मान्य केली नसल्याने विक्रेत्यांनी रविवारचा आठवडी बाजार बंद करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार लक्ष्मीपुरीत भरणाऱ्या या बाजारात आज काही मोजक्‍या शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी ठेवला होता. ग्राहकांनी तो खरेदी केला. याच बाजारात मसाला, चटणी, मिरची, भुसारी माल अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सवरील व्यवहार नियमितपणे सुरू होते. किरकोळ विक्रेते शाहू मार्केट यार्डातून भाजीपाला खरेदी करून या बाजारात विकतात. त्यांनी मात्र येथे आज भाजीपाला विक्री केली नाही.

आलेल्या मालाचे सौदे सुरू
दरम्यान, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज येथे आलेल्या भाजीपाल्याचे सौदे काढण्यात आले. तसेच किरकोळ प्रमाणात भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी शाहू मार्केट यार्डातील मिनी बाजार व घाऊक बाजारात भाजीपाला खरेदी करण्याची सोय केली. त्यामुळे बाजार समितीत सौद्यासाठी आलेला माल शिल्लक राहून नुकसान होण्याचे प्रमाणही टळले असल्याचे बाजार समितीचे उपसचिव मोहन सालपे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

पोलिस बंदोबस्त
बाजार समितीत किरकोळ विक्रेते व दलाल यांच्यात चर्चा होणार आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजता विक्रेते येथे आले होते. मात्र एका दलालासोबत रियाज बागवान या विक्रेत्याची वादावादी सुरू झाली. ती टोकाला गेली. याच वेळी शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर येथे दुपारपर्यंत बंदोबस्त होता.

आज उपोषण
किरकोळ विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण होणार आहे. त्याबाबत आज रात्री निर्णय घेण्यात येईल, असेही विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पिंटू आंबेकर यांनी सांगितले.

Web Title: Farmers sold vegetables