पाचशे गाड्या फोडून लूट करणार्‍यांना आवरण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

आजपासून सुरू झालेल्या शेतकरी संपाच्या आंदोलनाला काही ठिकाणी वेगळे वळण लागले. काही जागी आंदोलनाच्या नावाखाली लूट सुरू आहे. विशेषतः परराज्यातून आलेल्या ट्रक व मोठ्या वाहनांना लक्ष केले जात आहे

नगर : शेतकरी संपाच्या नावाखाली काही लोकांनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आणले आहे. नगर-मनमाड रोडवरील खिर्डी गणेश शिवारात काही कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुमारे पाचशे वाहनांची मोडतोड केली आहे.

यांनी मोठ्या प्रमाणात लूट केली. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी दुपारी हवेत गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. 

आजपासून सुरू झालेल्या शेतकरी संपाच्या आंदोलनाला काही ठिकाणी वेगळे वळण लागले. काही जागी आंदोलनाच्या नावाखाली लूट सुरू आहे. विशेषतः परराज्यातून आलेल्या ट्रक व मोठ्या वाहनांना लक्ष केले जात आहे.

खोबरे, बिस्किट, विविध साहित्य घेऊन चाललेल्या ट्रकला अडवून लूट केली जात आहे. कोपरगाव ते येवला दरम्यान परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याची स्थिती झाली होती. कोपरगाव तालुक्‍यातील आंचलगाव, खिर्डी गणेश तसेच येवला तालुक्‍यातील काही गावांमधील कार्यकर्त्यांनी लूट चालविली आहे.

शेतकरी संपाविषयीच्या इतर बातम्या

भोरमध्ये दूध संकलन बंद; रस्त्यावर दूध ओतून निषेध
शेतकऱ्याला एका दिवसात यातून बाहेर काढणं अशक्य- मुख्यमंत्री
पुण्यात शेतमालाची आवक निम्म्यावर; भाव वाढले
बारामतीत लिलाव रोखले, बाजार समितीचे काम बंद