फलटण - शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात सहाशे अफूची पक्व झाडे

faltan
faltan

फलटण (सातारा) : विडणी (ता. फलटण) येथे एका शेतकऱ्याच्या उसात सहाशे अफूची पक्व झाडे सापडल्याने विडणी परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे  परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम आखण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या एलसीबी विभागाने येथील इंगळेवस्ती नजीक असलेल्या नगारजी शिवारात पोपट यशवंत यादव (वय ५०) यांच्या उसाच्या शेतात छापा टाकला. यावेळी ऊसामध्ये सुमारे सहाशे अफुची पक्व झाडे जप्त करण्यात आली.

या झाडाचे वजन साडेआठ किलो असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा सर्व अफु जप्त करण्यात आला आहे. तर शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाजाभावानुसार याची किंमत किती होते याची प्रकिया सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com