शेतकऱ्यांचा कल परदेशी भाजीपाला पिकांकडे

सचिन देशमुख
रविवार, 25 डिसेंबर 2016

पाटण तालुक्‍यात भात, नाचणी, उसासह कलिंगड, स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटोचेही उत्पादन
पाटण - भात, नाचणी व कोयना धरणाच्या निर्मितीनंतर ऊस पिकावर अवलंबून असणाऱ्या पाटण तालुक्‍यात व्यावसायिक पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. शेतकऱ्यांना हमखास पैसा मिळवून देत आहेत. कलिंगड, स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटो, झुकिनी पिकांबरोबर परदेशी भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे.

पाटण तालुक्‍यात भात, नाचणी, उसासह कलिंगड, स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटोचेही उत्पादन
पाटण - भात, नाचणी व कोयना धरणाच्या निर्मितीनंतर ऊस पिकावर अवलंबून असणाऱ्या पाटण तालुक्‍यात व्यावसायिक पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. शेतकऱ्यांना हमखास पैसा मिळवून देत आहेत. कलिंगड, स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटो, झुकिनी पिकांबरोबर परदेशी भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे.

लहरी मॉन्सूनवर अवलंबून असणारा खरीप हंगाम सोडला, तर पाटण तालुक्‍यात बागायती क्षेत्र फार कमी होते. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर कोयना नदीचा उत्तर, दक्षिण काठ सोडला, तर म्हणावे अशी शेतीतील बदल पाहावयास मिळाले नाहीत. परंतु, शेतकऱ्यांची शिकलेली नवीन पिढी पारंपरिक शेतीला बगल देत आहे. भात, ऊस व नाचणी पिकापेक्षा भाजीपाला व फळेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे या चार वर्षांत त्यांचा कल वाढलेला आहे.
बीन्स, वाटाणा, कलिंगड, चेरी, टोमॅटो, झुकिनी पिकांबरोबर लाल कोबी, हाकुनी मिर्ची, ढबू मिर्ची, साधी मिर्ची, वांगी याबरोबर परदेशी भाजीपाला पिकाकडेही वळू लागला आहे. कोयना विभागात या सर्व पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाल्याने पाच हजार मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या कोयना परिसरात आधुनिक ठिबक तंत्रज्ञानातून बक्‍कळ पैसा मिळविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होत आहे.

कलिंगड, केळी या पिकांची गेल्या दोन वर्षांत मोठी उलाढाल झाली आहे. पाटणच्या वातावरणात स्ट्रॉबेरी पीकही दमदार येत असल्याने भांडवली खर्चाची ताकद असणारे शेतकरी या पिकांकडे वळू लागले आहेत. कलिंगड कोयना विभागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. व्यापाऱ्यांबरोबर शेतकरी आता स्वत: कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गावर स्टॉल टाकून विक्री करत आहेत. या विक्रीतून चांगला नफा मिळत असल्याने या चार महिन्यांत इतर उद्योग सोडून कलिंगड शेतीवर भर दिला जात आहे.

हातसडी तांदळामुळे आर्थिक बळकटी 
पाटणच्या लाल मातीतला इंद्रायणी तांदूळ जिल्हाभर त्याची चव पसरली आहे. काही शेतकऱ्यांनी हातसडीचा तांदूळ (ब्राऊन राइस) हा मधुमेह असणाऱ्या माणसांसाठी उपयुक्‍त असतो. त्याचेही उत्पादन बाजारपेठेत आणण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. हमखास बाजारपेठ मिळाली, तर हातसडीचा इंद्रायणी तांदूळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देईल.

पश्चिम महाराष्ट्र

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील वेणूबाई जालिंदर कोटकर ( वय ५० ) या महिलेचा स्वाईन फ्लू आजाराने मंगळवारी...

11.57 AM

कऱ्हाड : तालुक्यातील साबळवाडी येथे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या गाव विहीरीत कासव मृत अवस्थेत आढळले. ते कासव अठरा नख्यांचे आहे....

11.27 AM

निघोज : जवळा( ता पारनेर )येथे येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा (बुधवारी) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु...

11.24 AM