शिंगणापूर रोड येथील दुकानाला भीषण आग

संदिप कदम 
रविवार, 15 एप्रिल 2018

फलटण-शिंगणापूर रोड येथील दुकानाला काल मध्यरात्री भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

फलटण (जि. सातारा) - फलटण-शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या दुकानाला शनिवारी (ता. 14) मध्यरात्री अडीच वाजण्याचे सुमारास भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिंगणापूर रोड येथील साई कॉस्मेटिकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग लक्षात येताच तेथील घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर फलटण नगरपरिषदचे अग्निशमन दल दाखल झाले. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्‍याने पहाटे पाच पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

साई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजलाही आग लागली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा न केल्याने नक्की नुकसान किती झाले हे समजले नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A fierce fire on the shop at Shinganapur Road

टॅग्स