अश्‍लील नृत्य करणाऱ्या महिलांसह 19 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

अश्‍लील नृत्य करणाऱ्या आठ बारबालांसह 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी 12च्या सुमारास करण्यात आली.

सोलापूर - बाळे परिसरातील शिवाजी नगरजवळील हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रामध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला. अश्‍लील नृत्य करणाऱ्या आठ बारबालांसह 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी 12च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अश्‍लील नृत्य करणाऱ्या महिलांसह अशोककुमार मोतीलाल सोनार (वय 55, रा. खगेंद्र चटर्जी रोड, कोलकता), हेमंत सुधाकर भातंद्रेकर (वय 40, रा. उमानगरी, सोलापूर), विभीषण गुलाब लोंढे (वय 43, रा. वारद चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर), शिवशक्ती सन्मुखप्पा हिप्परगी (वय 22, रा. चौपाड, सोलापूर), परमेश्‍वर शिवलिंगप्पा कोळी (वय 25, रा. चंद्रोदयनगर, कुंभारी, सोलापूर), बसवराज शिवलिंगप्पा कोळी (वय 32, रा. जुनी मिल चाळ, सोलापूर), मंजूनाथ सूर्यनाथ मैंदर्गी, शिवराज पुंडलिक ससाणे, मनोज मनबहाद्दूर तीखादी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी पॅराडाईज, जय मल्हार या ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून कारवाई केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Filed the Crime against 19 people including dancers