श्रीगोंदे तालुक्‍यात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

श्रीगोंदे - तालुक्‍यातील राजापूर येथील भाजपचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी यांच्यावर शुक्रवारी पहाटे दोन ते तीन जणांनी गोळीबार केला. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असला, तरी गोळीबाराबाबत पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. चौधरी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ असलेल्या घोड नदीकाठच्या राजापूर येथील कवाष्टे वस्तीवर आज मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. जखमी झालेले चौधरी यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौधरी यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, ते नैसर्गिक विधीसाठी घराच्या मागे गेले. त्या वेळी तेथे असलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. त्यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले.

गोळीबाराची माहिती मिळताच बेलवंडीचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे पथकासह घटनास्थळी पोचले. वांगडे यांनी सांगितले, की घटनास्थळी बॅलेस्टिक पथक, न्यायवैद्यक विभागाचे पथक, श्‍वानपथक येऊन तपासणी करून गेले; मात्र ती जखम गोळीची आहे का, याबाबत शंका आहे. घटनास्थळी गोळीबार झाल्याचे पुरावे सापडले नाहीत. गोळीची पुंगळीही मिळाली नाही.

Web Title: firing on bjp member