इचलकरंजीतील पाच लाख लुटीतील संशयीत गजाआड

इचलकरंजीतील पाच लाख लुटीतील संशयीत गजाआड

इचलकरंजी - येथील फॅब्रीकेशन उद्योजकाला चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या दोघांना आज स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील 5 लाख 7 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली असून यातील एकजण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 

ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या निवृत्ती खुने (वय 25) व प्रशांत हनुमंत बगले (28, दोघेही रा.रा.शिंदे मळा, खोतवाडी) अशी अटक केलेल्यांचा नावे आहेत. यातील खुने याच्यावर शिरोळ पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीचा गुन्हा आहे. 

कोरोची (ता.हातकणंगले) येथील फॅब्रीकेशन उद्योजक उमेश मल्लाप्पा कुंभार (वय 41) यांना चाकूचा धाक दाखवून या दोघांनी 5 लाख 51 हजार 200 ची रोकड लुटली होती. लक्ष्मी प्रोसेस परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. याबाबतचा गुन्हा काल मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांत झाला होता.

या प्रकरणी तक्रार कुंभार यांनी दिलेल्या वर्णनावरुन स्थानिक गुन्हा शाखेने या दोन संशयितांना पकडले. गौरीशंकरनगर ते तारदाळ रोडवर दानम्मा मंदिर परिसरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोन्ही संशयितांना हस्तगत रोकडसह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकांने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com