चला, बार्बेक्‍यू एक्‍स्प्रेसमध्ये आस्वाद घ्या! 

चला, बार्बेक्‍यू एक्‍स्प्रेसमध्ये आस्वाद घ्या! 

कोल्हापूर - सडकून भूक लागलीय. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर फूड स्टॉल्स कुठे आहे, ते नजर शोधतेय. विविध पदार्थांमुळे तर भूक अधिक खवळलीय. मग वडापाव असू दे... नाही तर पाणीपुरी... किंवा कचोरी, समोसा. कधी एकदा डिशवर तुटून पडतो, असे होते. म्हणून देशात कुठेही रेल्वेने जा. तुम्हाला प्लॅटफॉर्मवर किंवा स्टेशनच्या बाहेर असे वैविध्यपूर्ण फूड मिळते. नेमकी हीच "कन्सेप्ट' घेऊन हॉटेल सयाजीतील बार्बेक्‍यू नेशनमध्ये दी इंडियन बार्बेक्‍यू एक्‍स्प्रेस हा फूड फेस्टिव्हल सुरू झाला असून, ट्रॅव्हल्ड अँड टेस्टेड इंडिया ही मध्यवर्ती कल्पना आहे. प्लॅटफॉर्म, रेल्वेचे डबे अशी फेस्टची मांडणी केली आहे. 

26 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील. संध्याकाळी सात ते रात्री 11 पर्यंत तुम्हाला डिनर मिळेल. देशातील विविध प्रांतांतील रेल्वे स्टेशनबाहेर मिळणारे फूड येथे उत्कृष्ट चवीसह मिळेल. यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, काश्‍मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, नेपाळ, पश्‍चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक प्रांतातील पदार्थांची रेलचेल आहे. याबाबत शेफ अनिश जोसेफ म्हणाले, ""हे पदार्थ विविध प्रांतांतील असले तरी खास कोल्हापूरकरांसाठी आम्ही या पदार्थांची चव खास पद्धतीने विकसित केली आहे. काही पाश्‍चिमात्य पदार्थांचाही यामध्ये समावेश असून, फूड फ्युजन केले आहे.'' 

सरव्यवस्थापक पुनीत महाजन, एफएमजी व्यवस्थापक राजेश राधाकृष्णन, शेफ अनिश जोसेफ, शेफ रमेश आडकुरकर, शेफ अत्तरसिंग राणा, कॅप्टन बलवंत, कॅप्टन विकास ही टीम सयाजीत तुमच्या स्वागतास सज्ज आहे. फेस्टमध्ये तुम्हाला व्हेज स्टार्टरमध्ये पेशावरी बरवान कुंभ विथ चीझ स्टफ, काश्‍मिरी सुर्कलाल पनीर टिक्का, उत्तर प्रदेशचा हरबरा कबाब, तर नॉन व्हेजमध्ये पश्‍चिम बंगालची कासुंदी चिंगरी विथ प्रॉन्स, हैदराबादी स्टाईलमध्ये तंगडी तंदूर, लखनवीचे बदाम शामी, मटन चॉप्स मिळतील. लाईव्ह काउंटर प्लॅटफॉर्मवर गोलगप्पे, पापडी चाट, राजस्थानी राज कचौरी, बंगालचे व्हेज काटे कबाब, महाराष्ट्राची पाव-भाजी, वडा-पाव, रुमाली रोटी, केरळीयन पराठा विथ मैदा अँड बनाना, पंजाबचा कुक्कड काठी कबाब, कोल्हापुरी खिमा मटण विथ पाव तर सुपमध्ये तमिळनाडूचे दाल मुल्लीगटतवानी, थुप्का मिळेल. मेन कोर्समध्ये पेपर चिकन चेट्टीनाडू, निहारी मटण, कर्नाटकची एडी गशी डिश विथ खेकडा, गोव्याची सुरमई करी, चिकन हैदराबादी बिर्याणी, गोश्‍त याकनी पुलाव, तांबडा, पांढरा रस्साही मिळेल. शिवाय सॅलड, पापड, गोड लोणचे, रायता, थैरू सदाम, कंधारी अन्‌ हवाईन फ्युजन सॅलड, स्प्राऊट, तुळशी आचारी पाश्‍ता, इंडो-चायनीज पदार्थ, तरकारी बिर्याणीही मिळेल. 

हे सगळे झाले की डेझर्ट, आइस्क्रीम, शीरकुर्मा, मिर्च का हलवा, सायभाजी, सिंधी पदार्थ, चॉकोलेट कुल्फी, गुलाबजामून विथ कुल्फी, कुल्फी विथ गाजर हलवा, केशर पिस्ता कुल्फीही मिळेल. यानंतर तुम्ही मसाला पानाचा आस्वाद घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com