विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभागाकडून जीवदान

sangli
sangli

तडसर (ता.कडेगाव जि. सांगली) - येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज 
जागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला

तडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण आज येथील विहिरीत पडले. ते विहीरीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते.

श्री.जाधव यांनी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर कडेगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळेल यांचच्यासह वन विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थ हरणाच्या सुटकेसाठी दाखल झाले. सर्वांनी जाळीच्या सहाय्याने केवळ अर्ध्या तासात हरणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीतून बाहेर व निसर्गाच्या सहवासात येताच अत्यानंदाने हरणाने टुनकण उडी मारत येथील वनक्षेत्रातील अधिवासात धूम ठोकली.

हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याने वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांनीही समाधान व आनंद व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने जागतिक जैव विविधता दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया दिली.या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल नितीन काळेल, वनपाल ए.पी.सवाखंडे, मोहन महाडिक, वनरक्षक, जितेंद्र खराडे, सिकंदर मुल्ला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com