आमदार शिवाजी कर्डिलेंसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नगर: पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांना गुरूवारपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडी वाढविण्यात आली. आज (मंगळवार) त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते.

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असता त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कार्यालयाची मोडतोड केली होती. या प्रकरणी काल आमदार कर्डिले, अफजल शेख यांना अटक करण्यात आले होते. या दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. ही कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. या प्रकरणात त्यांच्या कोठडीत 12 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत अफजल शेख, सारंग पंधाडे, सुरेश बनसोडे आणि अन्य एकाला ही कोठडी वाढविण्यात आली आहे.

Web Title: four member police custody of mla shivaji kardile