‘कास’मधून गावांना फुकट पाणी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सातारा - कास योजनेवर अवलंबून असलेल्या सातारा तालुक्‍यातील १५ गावांनी गेल्या १७ वर्षांत पालिकेच्या पाणीकरापोटी सुमारे १३ लाख रुपये थकविले आहेत. सातारकरांना मीटरने मोजून पाणी देण्याचे नियोजन सुरू असताना दुसऱ्या बाजूस ही गावे मोफत पाणी घेत आहेत. ग्रामीण भागातील मतांच्या राजकारणामुळे ही वसुली लांबत गेली. परिणामी, शहरी जनतेला एक आणि ग्रामीण जनतेला वेगळा न्याय, अशी सातारकरांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. 

कासच्या उघड्या पाटाच्या पाझरातून निर्माण होणाऱ्या झऱ्यांवर परळी खोऱ्यातील सावली, लावंघर, जांभळमुरे, शिंदेघर, आटाळी, शिंदेवाडी, अनावळे, सांबरवाडी, कासाणी, पेट्री, काळोशी, वडगाव, मस्करवाडी, सायळी, धनगरवाडी ही १५ गावे अवलंबून होती. २२ किलोमीटर बंदिस्त जलवाहिनी झाल्यानंतर या गावांना जलवाहिनीतून कनेक्‍शन देण्यात आले. गेल्यावर्षी कासचा सुरवातीचा सहा किलोमीटरचा पाट बंदिस्त करण्यात आला. त्यामुळे या अंतरातील रोहोट, पाटेघर, लुमणेखोल, आरगडवाडी, जांभळेघर, घाटवण या सहा गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने या गावांनी पालिकेकडे अर्धा इंची कनेक्‍शनची मागणी केली. पहिल्या १५ गावांनी कनेक्‍शन घेताना अनामत रकमेव्यतिरिक्त काही प्रमाणात पाणी कर भरला. गेल्या १७ वर्षांत १५ गावांच्या पाणीकराची एकूण रक्कम सुमारे १३ लाखांहून अधिक झाली. त्यापैकी या गावांनी आतापर्यंत केवळ ८५ हजार रुपये भरले आहेत. अद्यापही, या गावांचे सुमारे १२ लाख रुपये थकीत आहेत. 

पालिकेचा पाणीपुरवठा विभाग दरवर्षी या थकबाकीदार गावांना पाणी कराची रक्कम भरण्याच्या नोटिसा देतो. तशा यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर या गावांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र, नेहमीप्रमाणे मतांच्या राजकारणापुढे या नोटिसांना काडी इतकीही किंमत राहिली नाही. थकबाकीचा आकडा मात्र दिवसेंदिवस फुगत आहे. पालिका प्रशासन पाणीपुरवठ्याबाबत शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करत असल्याची भावना सातारकरांमध्ये मुळ धरू लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM