शुक्रवारी शाळा ठेवणार बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

कोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता. २०) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कारचा इशाराही या वेळी देण्यात आला.

कोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता. २०) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कारचा इशाराही या वेळी देण्यात आला.

भाजप सरकारच्या काळात कधी नाही इतके शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. संच मान्यतेतील त्रुटी, शिक्षक, शिक्षकेतर भरतीवरील बंदी, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न, विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा प्रश्‍न असे प्रश्‍न रेंगाळले आहेत. शासनाने आश्‍वासन देण्यापलीकडे काही केलेले नाही. दरवर्षी आंदोलनामुळे विद्यार्थी वेठीस धरले जाऊ नयेत, या उद्देशाने संस्थाचालक तसेच शिक्षकांनी आजपर्यंत संयम पाळला. आता मात्र सर्व बाबी हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. सेल्फी काढणे, शालेय पोषण आहाराची जबाबदारी यामुळे अशैक्षणिक कामांचा ताण वाढत आहे. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदीमुळे शाळेत घंटा कुणी द्यायची, असा प्रश्‍न आहे. वेतनेतर अनुदान थकीत आहे. शिक्षक भरतीचे अधिकार शिक्षण आयुक्तांना दिले गेले आहेत. संस्थाचालक आणि शिक्षकांना नाममात्र ठेवले आहे. शिक्षणात महसुली व्यवस्था आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हातील शाळा बंद ठेवत आहोत. तत्पूर्वी बुधवारी आणि गुरुवारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यातून सुधारणा न झाल्यास दहावी, बारावी परीक्षेवर नाइलाजाने बहिष्कार टाकावा लागेल.

जिल्ह्यातील सुमारे अडीच हजारांहून अधिक शाळांतील शिक्षक बंदमध्ये सहभागी होतील. या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होईल. तालुक्‍याच्या ठिकाणी तहसीलदांराना निवेदन दिले जाईल.
पत्रकार परिषदेस डी. बी. पाटील, व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्रभाकर आरडे, भरत रसाळे, एस. जी. तोडकर, संतोष आयरे, राजेश वरक, गिरीश फोंडे आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

शाखेत होती अठरा लाखाची रोकड; आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी...

04.51 PM

कोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती...

04.48 PM

शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव. मुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार...

04.39 PM