इंधन पाईप लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची

चंद्रकांत देवकते
शनिवार, 7 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) - जिल्ह्यातील २२ गावामधुन जाणारी कोयली-अहमदनगर-सोलापूर ही इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि.ची प्रस्तावित पाईप लाईन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे. या पाईप लाईनच्या भुसंपादनाचा निश्चीत आराखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान पर्यावरणाची हानी होणार नाही असे उपजिल्हाधिकारी आणि प्रर्यावरण जनसुनावणीचे अध्यक्ष संजय तेली यांनी सांगितले.

इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनच्या आवारात महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या वतीने या २३० कि.मी.च्या प्रस्तावित पाईपलाईन विस्तारीकरण व साठवणूक क्षमतेच्या कामाची पर्यावरण जनसुनावणी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी तेली बोलत होते. 

यावेळी पुणे पर्यावरण विभागाचे प्रादेशिक अधिकारी जे.एस. सांळुखे, सोलापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, कोयलीचे चीफ जनरल मॅनेजर बी.के. गुप्ता, पश्चिमी क्षेत्र बडोदराचे महाप्रबंधक विनोद कछवाहा, पाकणी डेपो व्यवस्थापक मोहम्मद शकील अख्तर, महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर आय.सी. पटेल, इंडीया ऑईल कॉर्पोरेशनचे मनमाड विभागाचे सक्षम प्राधिकारी ए.बी. मोहेकर, कनिष्ठ व्यवस्थापक गुंजनकुमार, आदीसह संबधीत वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोहोळ, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

या पाईपलाईन मधून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विमानाचे इंधन आदी द्रवरूप इंधनाची वाहतुक करण्यात येणार आहे. ज्या गावातुन ही पाईप लाईन जाणार त्या  भागातील गावाच्या आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणी, पर्यावरण यासाठी कंपनी कटिबद्ध असुन, राखीव निधीच्या माध्यमातुन वरील समस्या दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहीती विभागीय जनरल मॅनेजर कछवाह यांनी दिली.

Web Title: Fuel Pipe Line is important for the development of the district