विमानाच्या प्रतिकृतीतून गजानन महाराज पालखीवर पुष्पवृष्टी 

palakhi
palakhi

सोलापूर : गण गण गणात बोते.. माऊली.. चा जयघोष करीत शेगावच्या श्री गजानन महाराज पालखीचे शहरातील उपलप मंगल कार्यालयात आगमन झाले. भाविकांनी विमानाची प्रतिकृती बनवून त्याद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी केली. दिवसभर हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. 

कुचन प्रशालेत मुक्कामी असलेल्या पालखीचे सकाळी नऊच्या सुमारास सात रस्ता मार्गे उपलप मंगल कार्यालयात आगमन झाले. जयभवानी नवरात्र युवक मंडळ व श्री शंकर महाराज प्रतिष्ठानच्यावतीने गुलाब पाकळ्यांचे पायघड्या घातल्या होत्या. तसेच त्यांनी विमानाची प्रतिकृती बनवून वरून पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी कुणाल बोंथल, रूपेश जक्कल, सुनील वगरे, किशोर माळवदकर, हेमंत सवळे, नाना परांडकर, सुमीत कोळी, विक्रांत कालेकर आदी उपस्थित होते. सभागृहात पालखी आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी रांग करून सोडण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेविका मीनाक्षी कंपली, पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनीही पालखीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. उपलप परिवारातील ऋतुराज उपलप, शीतल उपलप, धनराज उपलप, स्वप्नील आकुलवार, राजकीरण वडनाल, नागेश मात्रे यांनीही पालखीचे स्वागत केले. उपलप परिवाराच्यावतीने वारकऱ्यांसह दिवसभरात तीस हजार भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. 

उपलप मंगल कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पूजा साहित्यासह खेळणी, घरगुती साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. सुरक्षेसाठी पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. बुधवारी सकाळी सहा वाजता श्री गजानन महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 

उपलप परिवार गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहे. दिवसभरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पालखीच्या मुक्कामावेळी वारकऱ्यांना जेवणाची व आराम करण्याची व्यवस्था केली जाते. पालखीच्या सानिध्यामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न होते. 
- ऋतुराज उपलप, संचालक, उपलप मंगल कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com