कऱ्हाडची विसर्जन मिरवणूक १९ तास; 7 डीजे डाॅल्बी पोलिसांनी जप्त

सचिन शिंदे 
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

रात्री बारानंतर पोलिसांनी वाद्य पूर्ण बंद केली.

कऱ्हाड : डाॅल्बी विरहीत झालेल्या येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जन मिरवणूक तब्बल १९ तास चालली. शेवटची मूर्ती पहाटे तीनच्या सुमारास विसर्जित झाली. दिवसभर पारंपारिक वाद्यांसह ढोल ताशा व झांजपथकाचा गजर होता. रात्री बेसुमार गुलालाची उधळणही करण्यात आली. सुमारे पन्नास टक्के मंडळांनी यावर्षी गुलालाचा वापर टाळला. विसर्जनासाठी आणलेले सात डीजे डाॅल्बी पोलिसांनी जप्त केले. रात्रीही अनेक मंडळांनी झांजपथक आणले होते. रात्री बारानंतर पोलिसांनी वाद्यं पूर्ण बंद केली. त्यामुऴे किरकोळ स्वरूपाची वादावादी झाली. मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणुका पुढे नेल्या. 

मिरवणुकांना सकाळी अकरापासून प्रारंभ झाला. वंदे मारतरम गणेश मंडळाची पहिली मूर्ती कृष्णापर्ण झाली. त्यानंतर सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत कऱ्हाडमधील पहिली गजानन नाट्य मंडळाची मूर्ती मिरवणुकीत दाखल झाली. त्यापूर्वी दत्त चौकातील नवभारत गणेश मंडळाची मूर्ती पालखी सहित मिरवणुकीत दाखल झाली. कृष्णा घाटावर मात्र विसर्जना दिवशीही सकाळ काम पूर्ण करण्याची तयारीच दिसत होती.

मूर्ती विसर्जनाला आल्या तरीही काही ठीकाणी मुरूम टाकण्याचे रां सुरू होते. पालिकेच्या या ढिसाळपणा बद्दल संताप व्यक्त होत होता. मूर्ती विसर्जीत करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना चिखलातून वाट काढावी लागत होती. विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या नेकृत्वाखाली दोन पोलिस उपाधिक्षक, दोन पोलिस निरिक्षक, बारा पोलिस अधिकारी व चारशे कर्मचारी तैनात होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी