गणेश विसर्जनप्रसंगी पुरोहित बुडाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

देवरूख : शहरातील विठ्ठल मंदिराचा पुजारी व पुरोहित तरुणाचा गणेश विसर्जन घाटात सप्तलिंगी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. विठ्ठल मंदिरातील गणेशाचे विसर्जन करताना हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला. बुडालेल्या तरुणाचे नाव निनाद चंद्रकांत जोशी (वय 21) असे आहे. 

देवरूख : शहरातील विठ्ठल मंदिराचा पुजारी व पुरोहित तरुणाचा गणेश विसर्जन घाटात सप्तलिंगी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. विठ्ठल मंदिरातील गणेशाचे विसर्जन करताना हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला. बुडालेल्या तरुणाचे नाव निनाद चंद्रकांत जोशी (वय 21) असे आहे. 

येथील विठ्ठल मंदिरात गेली चार वर्षे पुजारी म्हणून निनाद काम करीत होता. याच मंदिरातील श्री. गणेशाचे आज विसर्जन होते. निनाद या गणेश विसर्जनात सहभागी झाला होता. गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. नगर पंचायतीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या विसर्जन घाटाजवळ मिरवणूक आल्यानंतर निनाद याने सप्तलिंगी नदीपात्रात उडी घेतली. ही त्याची शेवटची उडी ठरली. हा प्रकार सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडला. निनाद बुडत असल्याचे लक्षात आल्यावर बंदोबस्तासाठी तेथे असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल वास्कर यांनी पाण्यात उडी मारली. निनादला बाहेर काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. पाण्यात बुडालेल्या निनाद काही वेळात जवळच्या बंधाऱ्याजवळ अडकलेला आढळला. पाण्यातून बाहेर काढल्यावर निनाद याच्यावर उपस्थित ग्रामस्थांनी वाचवण्याचा प्रयत्न केला यात त्याने उलटी देखील केली. त्यानंतर त्याचा कायमचा श्वाशोस्वास बंदच पडला. देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू ओढवला होता. त्याच्या अकस्मिक निधनाने देवरूख शहरावर शोककळा पसरली. अत्यंत हुषार व भटजी म्हणून अल्पावधीतच निनाद याचे नाव प्रसिध्द झाले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल, बहिण व लहान भाऊ असा परिवार आहे. 

जोशी कुटुंबीयांवर दुसरा आघात 
निनादची आजी कमळाबाई यांचे निधन होवून शनिवारीच तेरावा दिवस पार पडला होता. यानंतर गणेश विसर्जनासाठी निनाद गेला अन त्याचेही पाण्यात बुडून निधन झाले. यामुळे जोशी कुटुबीयांवर लागोपाठ आघात झाले.