कचऱ्यातून खतनिर्मितीसाठी ऑर्गेनिक कन्व्हर्टर

Karad-Municipal
Karad-Municipal

कऱ्हाड पालिकेचा पुढाकार; दररोज सहा ठिकाणी होणार एक टन खतनिर्मिती
कऱ्हाड - कचऱ्यावर प्रीक्रया करून त्याचे रोज एक टन खत निर्माण करण्यासाठी शहरातील सहा ठिकाणी ऑर्गेनिक कन्व्हर्टर बसवण्यात येणार आहेत. शहरी भागात प्रथमच असा प्रयोग होतो आहे. एका ठिकाणास दहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. १४ व्या वित्त आयोगातून त्याची तरतूद करण्यात आली आहे. सहाही ठिकाणच्या प्रकल्पांचा खर्च अंदाजे ७० लाख २८ हजार रुपये अपेक्षित आहे. 

शहरातून दररोज किमान ३२ टनांचा कचरा जमा होतो. त्यात १६ टन कचरा ओला व तितकाच सुका कचरा असतो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेने यापूर्वीच सुरू केला आहे. मात्र, सुक्‍या कचऱ्यावरील प्रकल्प अद्यापही सुरू नाही. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून पालिकेने पाच टनांचा बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते.

कचरा डेपो परिसरात जेवढ्या ट्यूब आहेत, त्या याच वीजनिर्मितीवर चालतात. येथे पालिका स्वयंपूर्ण झाल्याचे दिसते. तसेच ११ टन क्षमतेचे २६ कंपोस्ट पीटद्वारे सेंद्रिय खतही निर्मिती केली जात आहे. दोन्ही प्रकल्प एकाच ठिकाणी आहेत. शहरातील सगळा कचरा एकाच ठिकाणी येतो. तेथेच त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे येथील यंत्रणेवर भार येताना दिसतो आहे. त्यामुळे शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या विकेंद्रीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्न करताना दिसते. त्याचात एक भाग म्हणून शहरातील सहा वेगवगेळ्या ठिकाणी ऑर्गेनिक कन्व्हर्टर बसवण्यात येणार आहेत. 

प्रत्येक एका ठिकाणी पाच टन क्षमेतेचे ऑर्गेनिक कन्व्हर्टर बसवण्यात येणार आहेत. त्या सहा ठिकाणांसाठी ७० लाख २८ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेने ऑक्‍सिडेशन पॉण्ड येथे ज्या पद्धतीने कंपोस्ट पीटमधून तयार केलेले खत क्रश करण्यासाठी ग्रॅडर व स्क्रीनिंग मशिन बसवले 
आहे.

त्याच पध्दतीचे कार्वे नाक्‍यावर पाण्याच्या टाकीजवळ व स्मशानभूमी येथे कंपोस्ट पीटसाठी तशी मशिन बसवण्यात येणार आहे. ऑर्गेनिक कन्व्हर्टरसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली आहे. त्यात ऑर्गेनिक कन्व्हर्टरसह निर्माल्य कलश, ग्रॅडर व स्क्रीनिंग मशिन याचा समावेश आहे. त्यासाठी सहा ठिकाणी लागणाऱ्या मूलभूत सुविधांनाही त्याच खर्चास मंजुरी आहे.

...येथे बसणार ऑर्गेनिक कन्व्हर्टर
 मंगळवार पेठेतील स्मशानभूमी परिसर
 शिवाजी हाउसिंग सोसायटीतील एन आकाराचा बगीचा
 पालिकेच्या शाळा क्रमांक सात व बारा 
 वाखाण भागातील पालिकेची मोकळी जागा 
 बारा डबरी परिसरातील पंपिंग स्टेशन क्रमांक एक 
 प्रीतिसंगम बागेतील निर्माल्य कलश ठेवण्याची जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com