राजर्षी शाहू, महात्मा फुले यांना भारतरत्न द्या -  शरद पवार

sharad_pawar
sharad_pawar

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांना सर्वोच्च भारतरत्न किताबाने सन्मानीत करा. भारत सरकारने हा सन्मान केल्यास "भारतरत्न' किताबाची आणखीन उंची वाढेल, असे स्पष्ट मत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. लोकराजा फोरम आयोजित "राजर्षी' या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रमय पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हाऊसफुल गर्दीच्या साक्षीने हा सोहळा झाला. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. 

कार्यक्रमाला आमदार हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर शोभा बोंद्रे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, संजय मंडलिक, व्ही. बी. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com