माण नदी अजूनही तहानलेलीच

गोंदवले बुद्रुक - पुरेशा पावसाअभावी माण नदी यंदाही वाहिलीच नाही.
गोंदवले बुद्रुक - पुरेशा पावसाअभावी माण नदी यंदाही वाहिलीच नाही.

गोंदवले - बहुतांशी भागात माण नदी यंदा वाहिली असली, तरी दहिवडी व गोंदवले बुद्रुक परिसरात मात्र ती अजूनही तहानलेलीच आहे. या नदीवरील बंधाऱ्यात मात्र पाणीसाठा झाल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

माणमध्ये कुळकजाईच्या डोंगरात उगम पावणारी माण नदी तालुक्‍यातून सुमारे ५६ किलोमीटर अंतर वाहून राजेवाडी तलावाला मिळते. या नदीवर पूर्वी अगदी मोजक्‍या प्रमाणात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते. हे बंधारेही पावसाळा संपल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्याच्या सुमारास अडवले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी या नदीतून वाहताना दिसायचे. वारंवारच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नदीवरील बंधाऱ्यांची संख्या वाढवून पावसाचे पाणी जागोजागी अडविण्याचा प्रयत्न होत आहे. बंधाऱ्यांची संख्या वाढविली असली, तरी पर्जन्यमानात घट झाल्याने नदीत पाणी येऊ शकले नव्हते.

परिणामी गेल्या चार वर्षांत नदी वाहिलीच नव्हती. यंदा मात्र उशिरा का होईना तालुक्‍यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदीवरील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला.

पश्‍चिम भागातील नदीवरील बंधारे भरून आंधळी तलावातही मोठा पाणीसाठा झाला. गोंदवले खुर्दपासून पूर्वेकडे माण नदीत उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने या भागातही नदी वाहिली. मात्र, दहिवडी व गोंदवले बुद्रुक परिसरात तितकासा पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागात माण नदी यंदाही वाहिलीच नाही. सलग पाचव्या वर्षी या भागात नदी तहानलेलीच राहिल्याने भविष्यातील पाण्याची चिंता आहेच. मात्र, सध्यातरी या भागातही बंधाऱ्यात पाणी साठल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com