'आय स्टॅंड विथ गर्ल्स...'; मोहिमेला नेटिझन्सचा प्रतिसाद

शीतलकुमार कांबळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

सोलापूर - इंग्लिश विंग्लीश, क्वीन, पार्च्ड आणि आत्ताचा गाजत असलेला पिंक चित्रपटांमधून स्त्रियांच्या समानतेचा हक्क, विविध पातळ्यांवर त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा ऊहापोह करण्यात आला. याचा काहीसा अनुकूल परिणाम पुरुष मंडळींवरही होत आहे. यासोबतच साहित्याच्या माध्यमातून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, तिच्या प्रगतीसाठी आय स्टॅंड विथ गर्ल ही फेसबुकवरील मोहीम.

कोणतीही चळवळ, उपक्रम किंवा मोहीम याला पाठिंबा दर्शविण्यासाठी फेसबुकवरील प्रोफाइल पिक्‍चर बदलणे याचा ट्रेंड वाढत आहे. अशातूनच आय स्टॅंड विथ गर्ल या मोहिमेला सोलापुरातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक मुलींमध्ये असाधारण कर्तृत्व करण्याची शक्ती असते. गरज असते ती एका संधीची व पाठिंब्याची यातूनच ही मोहीम आकाराला येत आहे.

फेसबुकवरिल प्रोफाइल चित्र बदलल्यामुळे आपला मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. असे दिसते. मात्र यामुळे बदल लगेच घडून येणार नाही तर ही सुरवात नक्कीच आहे. अशर सुरवात करणाऱ्या नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया...

मुळातच आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत. मुलींच्या स्वप्नांना बळ मिळण्यासाठी प्रत्येक घरात हा विचारांचा वारसा पोचायला हवा. म्हणूनच आय स्टॅंड विथ गर्ल मोहिमेत सहभागी झालो.
- उपेंद्र टण्णू

कळत न कळत घरात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपण स्त्रियांच्या हक्कावर गदा आणत असतो. घरातील ठराविक कामे तिनेच का करायची.? प्रत्येक गोष्टीत तिनेच का ऍडजस्ट व्हायच? असा प्रश्‍न पडतो. समता प्रत्येक ठिकाणी यायलाच हवी.
- पंकज कांबळे :

मुली आपल्या समाजाचे भविष्य आहे. त्यांच्यात प्रगती झाली तर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यातील प्रत्येक कलागुणांना वाव मिळायला हवा. यासाठी त्यांच्या प्रत्येक निर्णय व हक्कासोबत मी नेहमीच राहीन.
- आशिष चिंचोलकर

फेसबुकवर प्रोफाइल चित्र बदलून लगेच बदलाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण ही एक सुरवात आहे. सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे चांगला संदेश पोचायला मदत मिळते. मी या मोहिमेत सहभागी झालो याचे समाधान आहे.
- सुमीत चलवादी

तुम्ही ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता
आंतरराष्ट्रीय पातळीवर आय स्टॅंड विथ गर्ल्स ही मोहीम सुरू आहे. तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता, यासाठी खालील लिंकवर भेट देता येईल.
http://blog.girlscouts.org/2016/03/stand-with-girls-this-international.html

Web Title: good response for 'I stand with girls'