सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी केले. तालुक्यातील मोहोळ नागरी सहकारी पत-पुरवठा संस्था मर्या, मोहोळ शाखा शिरापूर सो या पतसंस्थेच्या नुतन वास्तु शाखेचा शुभारंभ प्रसंगी माने बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे होते. प्रमुख उपस्थिती माजी आमदार राजन पाटील होते. यावेळी राजन पाटील यांनी या पतसंस्थेच्या 97 कोटीच्या ठेवीच्या यशामध्ये संचालक, कर्मचारी यांची पारदर्शकता महत्वाची आहे हे आर्वर्जुन सांगितले. 

यावेळी व्यासपिठावर पतसंस्थेचे चेअरमन कौशीक गायकवाड, नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवने, उमेश पाटील, उद्योगपती उज्वलभाई कोठारी, अभिमन्यु वाघमोडे, भिमाचे माजी संचालक शिवाजी चव्हाण, पंचायत समिती सदस्य  ज्ञानेश्वर चव्हाण, रामराजे कदम, सिंधुताई वाघमारे, रत्नमाला पोतदार, चंद्रहार चव्हाण, नागेश साठे, प्रकाश चवरे, सज्जन पाटील, रामचंद्र खांडेकर, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

या कार्यक्रमास आसपासच्या पंचक्रोशील बहुसंख्य नागरीकासह प्रामुख्याने मोहोळ नागरीचे माजी व्हाईस चेअरमन ब्रह्मदेव भोसले, संचालक नागनाथ सोनवने, शिरापुरचे सरपंच सागर राजेपांढरे, व्यवस्थापक नागनाथ टेळे, मोहोन चव्हाण, महेश पवार, हणमंत बाप्पा पोटरे, यशोदा कांबळे, कामीनीताई चोरमले उपस्थीत होते.

प्रास्ताविक कौशिक गायकवाड यांनी करीत असताना एक ऑक्टोबर पासुन कर्जदारांना 13% दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास शिरापुरसह आसपासच्या परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रमोद डोके यांनी केले. आभार सुजाता  राजेपांढरे यांनी मानले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com