शहर स्वच्छतेसाठी शासनाकडून कडक पावले

The government has taken strict action to clean the city
The government has taken strict action to clean the city

कऱ्हाड- शहरात साठून राहणाऱ्या कचऱ्यासह शहर हागणदारीमुक्त करण्यास शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून पालिकांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावर शौच करणाऱ्यास सुमारे पाचशे रूपये दंड करण्याचे अधिकार पालिकांना दिले आहेत. जिल्ह्यातील पालिकात ते आदेश उद्यापासून लागू होत आहेत. रस्त्यावर कचरा करणे, सार्वजनिक टिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणाऱ्यांवर पालिकेचे मुख्याधिकारी किंवा सक्षम अधिकारी थेट कारवाई करू शकतात. राज्य शासनाने पालिकांच्या अधिकार वाढ केली आहे. त्यामुळे शासनाने शहरी भागातील स्वच्छता यावरच थेट लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते आहे.

कचरा लाख मोलाचा अशी थीम घेवून शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दंडाचे अधिकार पालिकांना देण्याचा घेतलला निर्णय हा त्यापैकीच एक आहे. त्यासाठीचे दंडाचे दरही शासनाने जाहीर केले आहे. राज्यातील पालिका व महापालिकांनाही दर लागू आहेत. शहरी भागात अस्वच्छता जास्त आहे. त्याची पहाणी झाली. त्यानंतर शासनाने काही महत्वाचा निर्णय घेतले आहेत.

निर्णयानुसार दंडात्मक कारवाईची अमंलबजावणीचे आदेश पालिकांना दिले आहेत. त्यानुसार शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन तरतूदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्था विरोधात दंडात्मक कारवाई करावी, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. त्यासाठीचे पालिका व महापालिकांनी दंडाच्या रकमाही शासनाने निश्चीत करून दिल्या आहेत. शहरातील स्वच्छता अधिका चांगली रहावली, शहरेही हागणदारी मुक्त व्हावीत, यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून जिल्ह्यातील पालिका करणार आहेत. आठ पालिकांसह नगरपंचायतीही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकाच पुढाकार घेतील, असे सध्याचे चित्र आहे.

पालिकांसह महापालिकांमध्येही दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकांचे मुख्याधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुख्याधिकारी किंवा त्या क्षमतेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे यापुढे शहाराच्या कोणत्याही उघड्यावर शौच करण्यासह लघवी करणे, थुंकणे अथवा कोणताही रस्ता घाण करणे दंडास पात्र कृती ठरवली जाणार आहे.

उघड्यावर शौछ करणाऱ्यास पाचशे रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अ व ब पालिकांसाठी 150 तर क व ड साठी 100 रुपये, घाण करणे अ व ब साठी 180 तर क व ड साठी 150 रुपये, उघड्यांवर लघवी करणाऱ्यांसाठी अ व ब साठी 200 क व ड वर्गसाठी 100 अशी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

कारवाईस कारण की
1) व्यक्ती-संस्थाच्या अशा कृतींपासून सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य बाधीत होते. 
2) संबधित व्यक्ती-संस्थेला सार्वजनिक जबाबदारीसह वावरण्यासह सुजाण नागरीकत्वाची जाणीव व्हावी.
3) पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, पाणी प्रदुषण विरोधी अदिनियम 1981 नुसार होणार कारवाई 
4) शहरी भाग हागणदारी मुक्त करण्याचा शासनाने हाती घेतलेला प्रोजेक्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com