अपिलीय अर्जावर आता 23 जानेवारीला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्यातील सरकारी वकिलांची नेमणूक कशी केली, त्यांचे मानधन किती यासह इतर माहिती द्या, अशा माहिती अधिकारातील अपिलीय अर्जावर आता 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या वेळी मूळ तक्रारदार विक्रम विनय भावे (मुंबई) यांना प्रत्यक्ष हजर करावे, असे आदेश अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आज दिले. त्यानुसार आज अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाखल झालेले ऍड. समीर पटवर्धन पुढील तारखेस तक्रारदारासह दाखल होणार आहेत.

पानसरे हत्येच्या खटल्यात ऍड. शिवाजीराव राणे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबत कोणती प्रक्रिया राबविली आहे, यासह इतर माहिती मुंबईतील भावे यांनी "माहिती अधिकारात' जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागितली होती. त्यावर माहिती अधिकार अधिनियमामधील कलम 8 (छ) नुसार माहिती नाकारण्यात येत असल्याचे उत्तर देण्यात आले. यावर अपील म्हणून भावे यांनी अपर पोलिस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. त्याची सुनावणी आज येथे होती. भावे आजारी असल्यामुळे त्यांनी ऍड. पटवर्धन यांना नेमले. ते पुढील तारखेस तक्रारदारांसह हजर राहणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले....

01.45 AM

सातारा - सकाळ एनआयई, रोटरी क्‍लब, रोट्रॅक्‍ट व इनरव्हील क्‍लब ऑफ सातारा कॅम्प यांच्या वतीने रविवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ...

01.24 AM

कोल्हापूर  - चेतना विकास संस्था गतीमंद मुलांना पाठबळ आणि शिक्षण देत आहे. त्यामुळे या संस्थेच्या जागेबाबतचा प्रश्‍न...

01.24 AM