सांगली : मुलींचा जन्मदर वाढवणाऱ्या ग्रामपंचायतींना आता बक्षिस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सांगली : 'बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानांतर्गत मुलींचा जन्मदर वाढवणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिस देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीत झाला.

सांगली : 'बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानांतर्गत मुलींचा जन्मदर वाढवणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिस देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीत झाला.

प्रत्येक तालुक्‍यात तीन ग्रामपंचायतींना बक्षिस दिले जाणार आहे. सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मार्चअखेरच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. 'बेटी बचाव-बेटी पढाव' अभियानाबाबत चर्चा झाली. जिल्ह्यात प्रति हजारी पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण घटले होते. मुलींच्या जन्मदर वाढीबाबत उपक्रम राबवले जात आहेत. बेटी बचाव-बेटी पढाव अभियान देखील याचाच एक भाग आहे. ग्रामीण भागात अजूनही वंशाला दिवा म्हणून मुलांचा आग्रह धरला जातो. स्त्री भ्रूणहत्यासारखे लाजीरवाणे प्रमाण घडतात. म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ठोस उपक्रम राबवण्याबाबत डॉ. नायकवडी यांनी सूचना केल्या.  

मुलींचा जन्मदर वाढवण्यात अग्रेसर ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा निर्णय झाला. ज्या ग्रामपंचायती हद्दीत मुलींचा जन्मदर अधिक असेल आणि त्यांनी विविध उपक्रम राबवले असतील त्यांना बक्षिस दिले जाईल.  समिती सभेत महिला व बालकल्याणकडील इतर विषयाबाबत चर्चा झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील, समिती सदस्या आदी उपस्थित होते. 

Web Title: grampanchayat reward for birth of girl child