ग्रंथदिंडी, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

साताऱ्यात १३ जानेवारीपासून जिल्हा ग्रंथमहोत्सव; चार दिवस चालणार
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या साहित्यकार डॉ. आनंद यादव नगरीत ता. १३ ते १६ जानेवारी या कालावधीत १८ व्या ग्रंथमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व शिरीष चिटणीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

साताऱ्यात १३ जानेवारीपासून जिल्हा ग्रंथमहोत्सव; चार दिवस चालणार
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या साहित्यकार डॉ. आनंद यादव नगरीत ता. १३ ते १६ जानेवारी या कालावधीत १८ व्या ग्रंथमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व शिरीष चिटणीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

प्रा. पाटणे म्हणाले, ‘‘यंदाच्या महोत्सवाचे उद्‌घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते १३ जानेवारीस सकाळी साडेअकरा वाजता होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. भास्करराव आव्हाड आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उदयनराजे भोसले असून, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. महोत्सव कालावधीत ग्रंथदिंडी, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम होतील.’’ 

चिटणीस म्हणाले, ‘‘ग्रंथमहोत्सवाचा समारोप १६ जानेवारीस दुपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत होईल. त्या वेळी राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित राहतील. ग्रंथमहोत्सवात यंदा १२० स्टॉलची उभारणी केली असून, नेहमीच्या प्रकाशन संस्थांबरोबरच नव्या प्रकाशन संस्था सहभागी होत आहेत.’’

ग्रंथमहोत्सवातील कार्यक्रम
ता. १३ जानेवारी

सकाळी नऊ वाजता - ग्रंथदिंडी- गांधी मैदान ते जिल्हा परिषद मैदान दुपारी दोन - व्याख्यान - प्रा. यजुर्वेद महाजन (यशाकडे वाटचाल) सायंकाळी सहा - बंडा जोशी यांचा विनोदी एकपात्री कार्यक्रम (हास्यपंचमी)

ता. १४ जानेवारी
सकाळी नऊ वाजता - निमंत्रितांचे कविसंमेलन  दुपारी चार - परिसंवाद- सामाजिक आंदोलने आणि साहित्यातील प्रतिबिंब  सायंकाळी साडेसहा - सांज गझल

ता. १५ जानेवारी  
सकाळी साडेआठ वाजता - विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम  दुपारी चार - लोकरंग- लोकबहार- भारुडाचार्य डॉ. रामचंद्र देखणे व सहकारी  सायंकाळी सात ः स्वरनिनाद प्रस्तुत मधुर स्वरांगण 

ता. १६ जानेवारी 
सकाळी साडेआठ वाजता - इथे घडतात वाचक वक्‍ते  सकाळी साडेअकरा - कथाकथन  दुपारी चार - समारोप  सायंकाळी साडेसहा - गीतबहार 

Web Title: granthmahotsav in satara