ग्रीनझोनने प्लॉट अडचणीत

शिंगणापूर - ड्रोनच्या सहाय्याने शिंगणापूर गावचे बुधवारी घेतलेले विहंगम छायाचित्र.
शिंगणापूर - ड्रोनच्या सहाय्याने शिंगणापूर गावचे बुधवारी घेतलेले विहंगम छायाचित्र.

कोल्हापूर - करवीर माहात्म्यामध्ये गावाची नोंद असलेल्या शिंगणापूर (ता. करवीर) गावात जुन्या टाऊन प्लॅनिंगनुसार मंजुरी घेऊन बांधलेली घरे आणि खरेदी केलेल्या जमिनी ‘ग्रीन झोन’मध्ये गेल्या आहेत. त्यामुळे हे लोक रस्त्यावर आले आहेत. रस्ते, गटर्स, पाणी योजना सध्या प्रभावीपणे कार्यरत आहेत; पण निसर्गरम्य आणि शहरालगत असणाऱ्या शिंगणापूरमध्ये गावाचा विस्तार होत असताना बांधकामे ठप्प आहेत; मात्र काही प्रमाणात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न उद्‌भवू लागला आहे. आता प्राधिकरण या गावाचा काय कायापालट करणार, त्याचे नियोजन काय केले आहे. याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे. 

शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे म्हणाले, ‘‘प्राधिकरणाचा मनमानी कारभार आहे. लोक यात भरडून निघत आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन, नियम किंवा अटी काय आहेत, हे सांगितले जात नाही. प्राधिकरणाचे काय काम सुरू आहे, हे गावपातळीवर कोणालाही माहीत नाही. गावातील बांधकाम परवाने रखडले आहेत. दरम्यान, यापूर्वी १९८० ते ९० ते २०११ पर्यंत ज्या जमिनींची गुंठेवारी झाली आहे. त्यासाठी तहसीलदारांचे आदेशही झाले आहेत. त्याचे लेआऊट टाऊन प्लॅनिंगला मंजूर नाहीत. ते मंजूर करण्यासाठी टाऊन प्लॅनिंगकडे गेल्यावर ते म्हणतात प्राधिकरणाकडून त्याला मंजुरी घ्या.

यामध्ये लोकांची मोठी पिळवणूक लावली आहे. यामध्ये महानगरपालिका जे नियम लावते तेच नियम प्राधिकरणामध्ये आहेत. मग प्राधिकरण कशासाठी, हद्दवाढच बरी म्हणावी लागेल. या प्राधिकरणाचा उपयोग काय होणार. बांधकाम व्यावसायिक प्राधिकरणाचे नियम पाळतील, पण सर्वसामान्य लोकांना याची झळ सहन होणार नाही. तहसीलदारांचे बांधकामाबाबतचे अधिकारही गोठवले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची. पेयजल योजनेतून गावात पाणीपुरवठा केला जात आहे. एका ठिकाणी पाईपलाईन घालायचे काम शिल्लक आहे. तेही लवकरच घातली जाईल; पण प्राधिकरणामुळे शिंगणापूरचा कोणता आणि कसा कायापालट होणार हे एकदा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले पाहिजे. गावांतर्गत होणारे रस्ते मोठ्या रस्त्यांचा सध्या तरी उपयोग नाही, असे आवाहनही श्री. रोटे यांनी केले. सरपंच, उपसरपंच व सदस्यांना प्राधिकरणाची अधिसूचना आलेली नाही. त्यामुळे प्राधिकरण कार्यालयाने सर्वांनाच माहिती दिली पाहिजे. 

उपसरपंच अर्जुन मस्कर म्हणाले, ‘‘प्राधिकरण म्हणजे नेमके काय हे लोकांना माहीत नाही. प्राधिकरणामुळे मूळ गावठाणाचा विकास कसा होणार आणि वाढीव गावठाणाचा विकास कसा होणार, हे स्पष्ट केले पाहिजे. ग्रामपंचायतीतून दिले जाणारे बांधकाम परवाने बंद झाले आहेत. त्यामुळे लोक संभ्रम निर्माण झाले पाहिजेत. प्राधिकरण होऊ दे, असे वाटत होते, पण आता ते कसे होणार, याची माहिती मिळत नाही.

गावची ओळख 
 करवीर माहात्म्यामध्ये नोंद असणारे गाव 
 चंबुखडी गणपती मंदिर 
 चित्रपटाचे चित्रीकरण होणारे गाव 
 शहराशेजारी रहिवासी क्षेत्रासाठी चांगला पर्याय असणारे गाव.

१५ हजार गावची लोकसंख्या
७५००  एकूण मतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com