सोलापूर - सांगवी (खु.) येथील गुरव बंधूनी केली यशस्वी सेंद्रिय शेती 

solapur
solapur

अक्कलकोट (सोलापूर) : सांगवी खुर्द ता.अक्कलकोट येथील सोमेश्वर गुरव आणि त्यांची दोन मुले राहुल व अशोक हे स्वकष्टाने सेंद्रिय शेती फुलविली आहे. याद्वारे सेंद्रिय खतांची मात्रा वापरून फक्त भेंडीच्या रसापासून बनविलेला चवदार गुळ आणि घरातील जात्याद्वारे तयार केलेला तूर, हरभरा, मूग यांच्या सकस डाळींची निर्मिती ही सध्या बहरली असून त्याला अनेक ठिकाणांहून मोठी मागणी होत आहे.

सोमशेखर यांचा मुलगा राहुल हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन अभियंता पण साखर उद्योगतल्या खासगी नोकरीला कंटाळून स्वतःची चाळीस एकर शेती ज्यात विहीर, बोअर आणि नदीपासूनची पाइपलाइन यामुळे होणारी पाण्याची उपलब्धता याचा विचार करून स्वतःची शेती ही सेंद्रिय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या शेतात कोणतीही रासायनिक खते आणि औषधे न वापरता शेणखत, गांडूळखत, गोमूत्र आणि पतंजलीची प्रोम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रवे याचा वापर करून शेतातून पिकांचे उत्पादन सतत घेत आहेत. यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि सकसता ही खूप चांगली आहे. त्यातून तयार झालेल्या मालाला भरपूर उठाव आहे आणि त्याची विक्री ही देखील सध्या भारतात अनेक ठिकाणी होऊन प्रतिसाद मिळतो आहे. याचे एकमेव कारण म्हणजे लोकांना सध्या अनेक पिकांवर औषधी मारा केल्यामुळे रोगराई पसरत आहे. त्यापासून सुटका करण्यासाठी हा प्रयत्न ते सध्या करत आहेत.

राहुल गुरव हे यावर्षी सेंद्रिय खते वापरून 86032 जातीच्या उसाची लागवड केली आणि स्वतःच्या शेतात गुऱ्हाळ करून एक, पाच व दहा किलो वजनाची दहा टन दर्जेदार गुळाची निर्मिती केली आहे.तसेच आपल्याच शेतात पिकलेला तूर, हरभरा आणि मूग याच्या सेंद्रिय पद्धतीची उत्पादने आणि ही सर्व भिजवून घरात तीन जात्याद्वारे डाळींची निर्मिती करीत आहेत.ही सर्व उत्पादने गुणवत्तापूर्ण व सकस आहेत त्यामुळे लोकांना याचा फायदा होत आहे.याचबरोबर ज्वारी आणि गव्हाचे देखील सेंद्रिय उत्पादन घेतले जात आहे.हा सर्व शेतीचा डोलारा राहूलचे वडील सोमशेखर यांनी तयार केला आहे.ते आता वाढविणे आणि पूढे नेणे आणि उत्पादन क्षमता वाढवून दर्जेदार आहार निर्मिती करून लोकांना चांगले धान्य पुरवून स्वतःचे उत्कर्ष साधणे हे ध्येय बाळगून राहुल हे आपले भाऊ अशोक यांच्या सहकार्याने शेतीत काम करीत आहेत. येत्या काळात भारतातील सर्व मॉल आणि मोठ्या दुकानात आपले उत्पादन पोचविण्याचा त्यांचा मानस आहे.

मार्च महिन्यात वळसंग ता.दक्षिण सोलापूर येथे झालेल्या विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित पतंजली योग समितीच्या शेतकरी मेळाव्यात रामदेवबाबा यांच्या हस्ते सोमेश्वर गुरव यांचा शेतीतील प्रगतीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला होता.याचप्रमाणे शिवपुरीचे पुरुषोत्तम राजीमवाले यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन देखील लाभत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com