राजेराय मठात गुरुपौर्णिमा उत्सवास आजपासून प्रारंभ होणार

rajeray-math
rajeray-math

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे गुरुपौर्णिमा उत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले असून, त्याचा प्रारंभ आज (बुधवार) रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. आजपासून शुक्रवार २७ जुलै पर्यंत हा उत्सव चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे यांनी दिली आहे.

उत्सवकाळात दररोज सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत राजेराय मठात धर्मसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात ता.१८ रोजी मनोहर देगावकर (भक्तीसंगीत), ता.१९ रोजी विठ्ठल मंदिर भजन मंडळ (भक्तीसंगीत), ता.२० रोजी श्री वटवृक्ष महिला भजनी मंडळ (भक्तीसंगीत), ता.२१ रोजी श्री शारदा महिला मंडळ (भक्तीसंगीत), ता.२२ रोजी सतीश पाटील व मित्रमंडळ (हरिपाठ), ता.२३ रोजी सत्संग महिला भजनी मंडळ (भक्तीसंगीत), ता.२४ रोजी नमीत झिपरे व मित्रमंडळ (सामुदायिक नामस्मरण) , ता.२५ रोजी स्वकूळ समाज भजन मंडळ (भक्तीसंगीत), ता.२६ रोजी ओम बेला समर्थ महिला भजन मंडळ (भक्तीसंगीत) आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचप्रमाणे ता.२६ रोजी सायंकाळी सात वाजता 'अवघा रंग एक झाला' हे प्रा.संगीता चाटी आणि रमाकांत चाटी नांदेड यांचे भक्ती गीत सादर होणार आहे. 

मुख्य गुरुपौर्णिमा उत्सवात ता.२७ जुलै रोजी पहाटे ४ ते ६ नामस्मरण व नगरप्रदक्षिणा, सकाळी ६ ते ८ श्री स्वामी समर्थ पादुका व बेलानाथ बाबा समाधी पूजन, सकाळी १० ते १२ अभिषेक, दुपारी १२ ते १२.३० गुणवंत विद्यार्थी सत्कार, दुपारी १२.३० ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री स्वामी समर्थ फेसबुक ग्रुप यांचे सामुदायिक नामस्मरण आदी धार्मिक विधी होणार आहेत. शनिवार ता.२८ जुलै सायंकाळी ६ वाजता गोपाळकालाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन विकास दोडके, किसन झिपरे, डी एस जयदेव,अनिल मंगरुळे, दत्तात्रय मोरे, भुवनेश वर्दे, वत्सला मोरे, बिल्वराज नाबर, विजयकुमार गाजूल, ओमप्रकाश तळेकर आदी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com