गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीत सुरू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

दोन किलोच्या सोन्याच्या पादुका 
​साईबाबा आयुष्यभर द्वारकामाई मंदिरात राहत होते. आग्रा येथील भाविक दांपत्य अजय व संध्या गुप्ता यांनी तेथे बसविण्यासाठी दोन किलोच्या सोन्याच्या पादुका साईचरणी अर्पण केल्या. नंतर या सुवर्णपादुका मंदिरात स्थापित करण्यात आल्या.

शिर्डी - साईबाबा संस्थानाच्या गुरुपौर्णिमा उत्सवास शनिवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात प्रारंभ झाला. मंदिराची रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट, आग्रा येथील दांपत्याने द्वारकामाई मंदिरात बसविण्यासाठी साईचरणी अर्पण केलेल्या दोन किलोच्या सोन्याच्या पादुका ही उत्सवाच्या पहिल्या दिवसाची वैशिष्ट्ये होती. 

दिवसभरात एक लाखाहून अधिक भाविकांनी साईदर्शन घेतले. त्यात झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी गुर्म यांचा समावेश होता. पालख्यांसोबत आलेल्या पदयात्रींनी शहरातील मुख्य रस्ते कालपासूनच गजबजले होते. साई मंदिरातून पहाटे काढलेल्या साईचरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला. नंतर अखंड पारायण सोहळा सुरू झाला. नगराध्यक्ष योगिता शेळके, संस्थानाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

दोन किलोच्या सोन्याच्या पादुका 
साईबाबा आयुष्यभर द्वारकामाई मंदिरात राहत होते. आग्रा येथील भाविक दांपत्य अजय व संध्या गुप्ता यांनी तेथे बसविण्यासाठी दोन किलोच्या सोन्याच्या पादुका साईचरणी अर्पण केल्या. नंतर या सुवर्णपादुका मंदिरात स्थापित करण्यात आल्या.