हज यात्रेकरूंची दोन कोटींची फसवणूक

हज यात्रेकरूंची दोन कोटींची फसवणूक

इस्लामपूर - मिरज येथील गुरुवार पेठेतील आशियाना हज अँड उमराह ऑर्गनायझर संस्थेच्या इरफान शेखने १४८ हज यात्रेकरूंची सुमारे दोन कोटींची फसवणूक केली आहे. त्याची चौकशी करावी, त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी इंडियन मुस्लिम लीग, अन्य समाजातील काहींनी केली. इस्लामपूर पोलिसांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा महत्त्वाची असते. आयुष्यात ती एकदा तरी करावी, अशी श्रद्धा असल्याने लोक आयुष्यभर पै-पै गोळा करून यात्रेला जातात. मिरजेच्या आशियाना हज अँड उमराह ऑर्गनायझर संस्थेमार्फत लोकांना यात्रेला पाठविले जाते. यंदा इस्लामपूर परिसरातील अनेकांनी यात्रेला जाण्यासाठी पैसे भरले. शेखने व्हिसा देण्याचे 
आश्‍वासन देऊन पैसे घेतले. हजला जाण्यासाठी सर्वांनी तयारी केली. अनेकांचे शुभेच्छापर सत्कारही झाले. मात्र, हजला जायच्या वेळेस शेखने सर्वांशी संपर्क बंद केला. फोन घेतले नाहीत. मागितल्यानंतर पैसे दिले नाहीत. उलट धमक्‍या दिल्या. काहींना न वटणारे धनादेश दिले. त्याचे दुबईशी कनेक्‍शन आहे. तो परागंदा होण्याची शक्‍यता विचारात घेऊन त्याच्यावर तातडीने कारवाई करावी, त्याचा पासपोर्ट रद्द करावा, तसेच संस्थेची मान्यता काढून घेऊन पीडित लोकांचे पैसे परत मिळवून द्यावेत.

निवेदनावर माजिद इबुशे, बजरंग भोसले, सुधीर कांबळे, तौसिफ म्हाब्री, मोहसीन खाटीक, कलिम मुजावर, निहाल खानजादे, दस्तगीर जमादार, फिरोज मोमीन यांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com