सोलापूर - मोहोळ पंचायतीसमोर हलगीनाद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) : शासन निर्णयानुसार अपंगांसाठीचा तीन टक्के निधी खर्च करावा, जाणुन बुजुन खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती अंदोलन संघटनेच्या वतीने मोहोळ पंचायत समितीसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. मात्र बराच वेळ कोणीच आधिकारी न आल्याने अखेर अपंग गटविकास अधिकारी दालनात घुसले मात्र अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या यशस्वी शिष्टाईने अंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रत्येक ग्रामपंचायतीला अपंगासाठी उत्पन्नाच्या तीन टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार आहे तसा शासन निर्णय आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीनी हा निधीच खर्च केला नाही त्या बाबत त्यांची उदासिनता आहे जे ग्रामसेवक अपंग निधी खर्च करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी.

गटविकास अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टी माहिती असतानाही त्यांची अपंगाच्या कामाविषयी उदासीनता असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष दतात्रय शेगर यांनी केला.

दरम्यान याच वेळी पंचायत समिती सभागृहात अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली  तालुक्याच्या विविध प्रश्नावर आढावा बैठक सुरू होती ती संपताच डोंगरे गटविकास अधिकारी दालनात आले त्यांनी यशस्वी मध्यस्थी करून प्रशासनाला कांही  सुचना केल्या त्या गटविकास अधिकारी यांनी मान्य केल्यावर  अंदोलन स्थगित करण्यात आले 

आंदोलनातील सूचना पुढीलप्रमाणे -

ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची बीले काढताना तीन टक्के निधी खर्च केल्याची खात्री करूनच बिले काढावीत.

या कामी एक चौकशी समिती नेमावी व तीने दोन माहिन्यातुन आढावा घ्यावा.

Web Title: halginad agitation at mohol nagar panchayat