कोयनेचे दरवाजे अर्ध्या फुटावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 सप्टेंबर 2016

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने काल रात्री पावणेबारा वाजता धरणाचे दरवाजे साडेसात फुटांनी उचलण्यात आले होते. मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने आज सायंकाळी पावणेसहा वाजता ते अर्ध्या फुटावर आणण्यात आले. त्यामुळे सध्या 8 हजार 503 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीची पाणीपातळी कमी झाल्याने मुळगाव पुलावरील वाहतूक आज सुरळीत सुरू झाली. 
 
काल सायंकाळी सहा वाजता पाणीसाठा नियंत्रणासाठी दरवाजे सहा फुटांवर करण्यात आले होते. त्यादरम्यान पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने 76 हजार क्‍युसेक पाण्याची आवक होत होती. रात्री पावणेबारा वाजता धरण व्यवस्थापनाने दरवाजे साडेसात फुटांनी उचलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरवाजातून 66 हजार क्‍युसेक व पायथा वीजगृहातून दोन हजार असा 68 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. 
 
मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला व आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने सायंकाळी पावणेसहा वाजता दरवाजे अर्धा फुटावर स्थिर ठेवले आहेत. धरणाची पाणीपातळी 2161.11 फूट व पाणीसाठा 103.19 टीएमसी आहे. धरणात प्रतिसेकंद 20 हजार क्‍युसेक पाण्याची आवक होत असून दरवाजातून 6 हजार 503 क्‍युसेक व पायथा वीजगृहातून दोन हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.