रंगपंचमीसाठी 41 वनस्पतीपासून रंग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - येथील निसर्गमित्र संस्थेच्यावतीने यंदाही होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर वनस्पतीजन्य रंग उपलब्ध केले आहेत. यंदा 41 प्रकारच्या वनस्पतींपासून सात विविध रंगांची निर्मिती केली असून रंग कसे तयार करायचे, याबाबतची प्रात्यक्षिकेही ठिकठिकाणी दाखवली जात आहेत. दरम्यान, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते या रंगांच्या विक्रीला प्रारंभ झाला. अधिकाधिक लोकांनी हे रंग वापरून कमीत कमी पाण्यात खेळता येईल, अशी इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

गेल्या काही वर्षापासून बाजारात इकोफ्रेंडली रंगांच्या जाहिराती करून रासायनिक रंगांची विक्री होत आहे. या पार्श्‍वभूमीवर निसर्गमित्र संस्थेने जाणिवपूर्वक वनस्पतीजन्य रंग उपलब्ध केले आहेत. ते कसे तयार करायचे, याबाबतची प्रात्यक्षिके विविध महिला बचत गट, महिला संस्थांसाठी दिली आहेत. केवळ उत्पादन खर्चात हे रंग उपलब्ध केले जाणार असून संस्थेच्या शाहूपुरी एक्‍स्टेन्शन येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात दुपारी तीन ते सात या वेळेत रंग उपलब्ध असतील. 

रंगपंचमीच्या निमित्ताने कोणतेही हिडीस व असभ्य वर्तन न करता आनंद व प्रेम निसर्गाप्रती व्यक्त करावे, या उद्देशाने आदर्श सहेली मंचच्या पुढाकाराने वर्षभर विविध फुलांचे संकलन केले जाते. त्यातून हे रंग तयार केले आहेत. सांडगे-पापड व इतर खाद्य पदार्थांमध्ये वापरायचे रंगही तयार केले असून त्याचीही विक्री नाममात्र किमतीत केली जाणार आहे. ज्या शाळा व मंडळांना मोठ्या प्रमाणावर रंग पाहिजे असतील, त्यांनी तत्काळ संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. 

या वनस्पतींपासून बनवले रंग... 
झेंडू, गुलाब, शेंदरी, पळस, काटेसावर, पांगारा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, कडूलिंब, मेहंदी, नीलमोहर, बहावा, बारमोडी, हिरडा, बेहडा, डाळिंब साल अशा वनस्पतींचा रंग तयार करण्यासाठी वापर केला जातो. या रंगांमुळे त्वचेला, डोळ्यांना कोणतीही इजा होत नाही. त्याशिवाय सर्व रंग पाण्यात विरघळणारे असून चेहरा रंगवण्यासाठीही सोपे जाते. महत्वाचं म्हणजे हे रंग धुवून काढण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर होतो. 

Web Title: Holi colors for 41 plants