पत्नी, आईच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

सागर सदाशिव घोरपडे (वय 40) व आई कल्पना (58) दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली.

उंब्रज (सातारा) : घरगुती वादातून पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. वराडे येथे ही घटना घडली. त्यात पत्नी मोहिणी सागर घोरपडे (वय 32) हीचा उपचारावेळी मृत्यू झाला.

सागर सदाशिव घोरपडे (वय 40) व आई कल्पना (58) दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वराडे  येथे सागर घोरपडे पत्नी मोहिनी व आई कल्पना यांच्यासमवेत राहतात. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घरा मागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही कऱ्हा़ड येथील रुग्णालयात हलविले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई व सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. याची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: husband killed wife in Karhad

टॅग्स